Sameer Wankhede Ba**ds of Bollywood x
मनोरंजन बातम्या

Sameer Wankhede : समीर वानखेडे भडकले! शाहरुख खान, नेटफ्लिक्सवर मानहानीचा खटला, २ कोटींची केली मागणी

Sameer Wankhede Ba**ds of Bollywood :समीर वानखेडे यांनी बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजचे निर्माते रेड चिलीज, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अन्य कंपन्यांवर मानहानीचा खटला दाखल केला आहे.

Yash Shirke

  • समीर वानखेडे यांनी शाहरुख खानच्या रेड चिलीज आणि नेटफ्लिक्सवर मानहानीचा खटला दाखल केला.

  • 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेब सिरीज खोटी, आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केला.

  • वानखेडे यांनी मानहानीचा खटला दाखल करताना २ कोटींची नुकसानभरपाई मागितली आहे.

Sameer Wankhede sues Red Chillies, Netflix over 'Ba**ds of Bollywood :अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट यांच्या विरोधात आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात कायमस्वरूपी आणि अनिवार्य मनाई आदेश, घोषणा आणि नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. रेड चिलीज व्यतिरिक्त ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि इतर पक्षांविरुद्ध समीर वानखेडे यांनी खटला दाखल केला आहे.

शाहरुख खानविरुद्ध मानहानीचा खटला दाखल

रेड चिलीज निर्मित आणि नेटफ्लिक्सवर प्रसारित 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही वेब सिरीज खोटी, दुर्भावनापूर्ण आणि बदनामी करणारी आहे. ही सिरीज अंमली पदार्थांविरोधी संस्थांची नकारात्मक आणि दिशाभूल करणारी प्रतिमा सादर करते. यामुळे कायदा अंमलबजावणीवरील जनतेचा विश्वास कमी होत आहे, असा आरोप समीर वानखेडे यांनी केला आहे. त्यांनी 'समीर वानखेडे विरुद्ध आर्यन खान हा खटला मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबईतील एनडीपीएस विशेष न्यायालयात प्रलंबित असताना ही वेब सिरीज जाणूनबुजून त्यांची प्रतिष्ठा कलंकित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे', असे म्हटले आहे.

'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सिरीजमधील एका पात्राला सत्यमेव जयते असे म्हणत अश्लील हावभाव करताना दाखवण्यात आले आहे. हे कृत्य राष्ट्रीय चिन्हाचा अपमान आहे, यातून राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ चे गंभीर उल्लंघन करणारे आहे, असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे. त्यांनी सिरीजच्या निर्मात्यांवर मानहानीचा खटला दाखल केला आहे.

वेब सिरीजमधील मजकूर माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या काही कलमांचे उल्लंघन करतो. सिरीज अश्लील आणि आक्षेपार्ह सादरीकरणाद्वारे राष्ट्रीय भावना दुखावण्याचा प्रयत्न करते. वानखेडे यांनी याचिकेत २ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली आहे. ही रक्कम टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दान केली जाणार असल्याचे वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Gift Reel: सोनपापडी नाही! दिवाळीला असं गिफ्ट दिलं की लोकांनी विचारलं व्हॅकेन्सी आहे का? व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

प्रवाशांसाठी मोठी बातमी! १० लोकल स्टेशन्सचं होणार कायापालट, लवकरच रेल्वेच्या नियंत्रणात जाणार

Diwali 2025 : जेवणाचा मेन्यू ठरला! फक्त ३० मिनिटांत बनेल स्पेशल थाळी, एकदा ट्राय तर करा 'या' सिंपल रेसिपी

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT