Naga Chaitanya And Samantha Prabhu News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Samantha Ruth Prabhu News : "कठीण काळात हार न मानता मी...", समांथा प्रभुने शेअर केला कठीण काळातला संघर्ष

Samantha Ruth Prabhu Talks About Her Personal Life : नुकताच 'सिटाडेल' वेबसीरीजचा एक कार्यक्रम झाला. यावेळी समांथा आणि वरुणने त्यांच्या मोस्टवेटेड प्रोजेक्टबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. यावेळी समांथाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले आहे.

Chetan Bodke

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सौंदर्यवान अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) कायमच प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या समांथा व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. नुकताच 'सिटाडेल' वेबसीरीजचा एक कार्यक्रम झाला. यावेळी समांथा आणि वरुणने त्यांच्या मोस्टवेटेड प्रोजेक्टबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. यावेळी समांथाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले आहे.

'सिटाडेल' वेबसीरीजच्या प्रमोशनदरम्यान समांथाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले. कार्यक्रमात ती म्हणाली, "जरीही तो विषय तिथेच संपवला तरीही गोष्ट संपत नाही. त्यामुळे मी स्वत:ला त्या दिवसांत सांभाळलं. मी माझे मनोधैर्य वाढवले ​​आणि स्वत:ला नव्या जीवनात परत आणले." या कार्यक्रमात वरूणने मी समांथाचा फार मोठा फॅन असल्याचं सांगितलं. यावेळी समांथाच्या 'मक्खी' चित्रपटातील अभिनयाचेही कौतुक केले. मी समांथाला या चित्रपटापासून ओळखू लागलो, असं वरूण म्हणाला.

समंथाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे तर, तिने २०१७ मध्ये साऊथ अभिनेता नागा चैतन्यसोबत लग्न केले होते. त्यांचं लग्न फार काळ काही टिकलं नाही. त्यांनी चार वर्षानंतर घटस्फोटाची घोषणा केली. समंथा वेळोवेळी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायची. 'सिटाडेल' सीरीजची रुसो ब्रदर्सने निर्मिती केलेली आहे. हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या 'सिटाडेल' सीरीजची हिंदी भाषेतील सीरीज आहे.

'सिटाडेल' सीरीजचे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केले आहे. याआधी दिग्दर्शक राज आणि डिकेने मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन २' सीरीजमध्ये समंथासोबत काम केले आहे. 'सिटाडेल'मध्ये समांथा प्रभू आणि वरुण धवन ॲक्शन आणि रोमान्स करताना दिसणार आहे. 'सिटाडेल' ही सीरीज ७ नोव्हेंबर २०२४ ला प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

SCROLL FOR NEXT