'शोले' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात गाजलेला सिनेमा आहे. त्या चित्रपटात बसंतीपासून ते जय-वीरू आणि गब्बरपर्यंतच्या पात्रांनी लोकांच्या हृदयावर आपली छाप सोडली आहे. या चित्रपटाची पटकथा सलमान खानचे वडील सलीम आणि जावेद अख्तर यांनी लिहिली होती.
'पचास-पचास कोस दूर गांव में जब बच्चा रोता है, तो मां कहती है, सो जा नहीं तो गब्बर आ जाएगा' और 'बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना' असे चित्रपटातील भन्नाट डायलॉग आजही लोकांकडून वापरले जातात. अशातच अलीकडेच बॉलीवूडचा दबंग सलमान खानने शोलेच्या रिमेकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, एवढेच नाही तर या चित्रपटात आपली व्यक्तिरेखा काय असेल हेही त्याने ठरवले आहे.
सलमान खान शोलेमध्ये कोणती भूमिका साकारणार?
वास्तविक, काही दिवसांपूर्वी प्राइम व्हिडिओच्या एका पोस्टनुसार, त्यात फराह खानने होस्ट केला होता. यावेळी, सलीम- जावेद व्यतिरिक्त, त्यांच्या डॉक्युमेण्ट्रीचे निर्माते सलमान खान-फरहान अख्तर आणि झोया अख्तर देखील उपस्थित होते.
तिथे चर्चेदरम्यान फराहने सलमान खानला सलीम-जावेदच्या कोणत्या चित्रपटाचा रिमेक बनवायला तुम्हाला आवडेल असे विचारले असता, टायगर सलमान खानने (salman khan) म्हटले की, "मला शोले (sholay) आणि दिवारचा रिमेक करायला आवडेल". त्याचे म्हणणे ऐकून फराह खानने विचारले, तुला जय की वीरू बनायला आवडेल, तेव्हा शेजारी बसलेल्या झोया-फरहान म्हणाले, 'तो फक्त वीरू बनेल', पण सलमानने उत्तर दिले, "मी जय आणि वीरू दोन्ही बनू शकतो, मी गब्बर ची भूमिका मी देखील करू शकतो."
सलमान खानने गब्बरची भूमिका साकारण्यास सांगताच त्याच्या वडिलांनी सांगितले की, त्यावेळी चित्रपटातील कलाकारांनाही गब्बरची भूमिका करायची होती. अमिताभ बच्चन आणि संजीव कुमार दोघेही 'गब्बर'ची भूमिका साकारणार होते.
शोले चित्रपटातील ही व्यक्तिरेखा अमजद खानने साकारली होती. 'गब्बर' हे भारतीय चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक पात्र बनले आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी-अमजद खान यांसारख्या स्टार्सची व्यक्तिरेखा आजही लोकांच्या हृदयात घर करून आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.