Salman Khan Security Review Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Security Review: खळबळजनक! अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

Salman Khan Get Threats: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून अभिनेता सलमान खानला फेसबुकच्या माध्यमातून पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

Chetan Bodke

Salman Khan Get Threats

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी आली आहे. अभिनेत्याला धमकी देणारी पोस्ट सोशल मीडियावर दिसल्यानंतर मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या सुरक्षेचा आढावा घेतला. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर त्याला मुंबई पोलिसांकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून फेसबुकवर रविवारी धमकीची पोस्ट करण्यात आली होती. त्या पोस्टमध्ये, पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालला उद्देशून ती पोस्ट करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून लिहिलेल्या पोस्टमध्ये, “तू सलमान खानला तुझा भाऊ मानतोस, पण आता त्याच तुझ्या भावाने तुला येऊन वाचवण्याची वेळ आली आहे. हा मेसेज तुझ्यासोबत सलमान खानसाठीही आहे. दाऊद तुला वाचवेल, या भ्रमात राहू नको. तुला कोणीही वाचवू शकणार नाही.”

सिद्धु मुसेवालाच्या मृत्यूनंतर तू दिलेल्या नाट्यमय प्रतिक्रियेकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं नाही. आम्हाला सर्वांना माहित आहे, तो कसा व्यक्ती आहे आणि त्याचा गुन्हेगारीविश्वातील संबंध कसा आहे हे आम्हाला माहित आहे. तुम्ही आता आमच्या रडारवर आहात. हा फक्त ट्रेलर होता.”

“संपूर्ण चित्रपट तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. तो चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. तुम्हाला ज्या देशात हवं त्या देशामध्ये पळून जा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मृत्यूला व्हिसाची गरज नसते. मृत्यू कोणत्याही आमंत्रणाशिवाय येतो.”

“माझी सलमानसोबत कुठलीही मैत्री नाही. त्याची आणि माझी भेट ‘मौजा ही मौजा’च्या ट्रेलर लाँचिंगच्या वेळी आणि बिग बॉसच्या सेटवर भेट झाली होती. मला रविवारी पहाटे १२:३० ते १ वाजेच्या दरम्यान, धमकी मिळाली. या घटनेमागील नेमकं कारण काय मला माहित नाही. मला ती धमकी पाहून खूप मोठा धक्का बसला आहे. मी यापूर्वी कधी अशा घटनेचा सामना केलेला नाही. माझे कोणासोबतही वैर नाही. या हल्ल्यामागचा मास्टरमाईंड कोण आहे, मला माहित नाही. या घटनेची मी कल्पना करु शकत नाही.” अशी माहिती गिप्पीने न्यूज १८ ला दिलेली आहे.

“धमकीची पोस्ट कोणी आणि कुठून केली आहे, याबद्दलचा आम्ही माहिती मिळवत आहोत. सोशल मीडिया अकाऊंट खरंच बिश्नोईचं आहे का, याचा तपास आम्ही करीत आहेत. इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस शोधण्याचाही आम्ही प्रयत्न करतोय”, अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. याआधीही सलमानला बिश्नोई गँगच्या एका सदस्याने धमकीचा मेल पाठवला होता. त्याला मिळालेल्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेरील आणि त्याच्या सुरक्षेतही वाढ केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT