Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील दोन आरोपी ठार; पंजाबच्या जेलमध्ये नेमकं काय घडलं?

गोइंदवाल मध्यवर्ती कारागृहात पंजाबी गायक सिद्धू मूसवाला खून प्रकरणातील आरोपींना ठेवण्यात आलं होतं.
Sidhu Moose Wala Case
Sidhu Moose Wala CaseSaam TV
Published On

Sidhu Moose Wala Case : पंजाबच्या तरनतारन येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील गोइंदवाल मध्यवर्ती कारागृहात पंजाबी गायक सिद्धू मूसवाला खून प्रकरणातील आरोपींना ठेवण्यात आलं होतं. यातील तीन आरोपींमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत दोन आरोपींचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक आरोपी गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

Sidhu Moose Wala Case
Mumbai Crime News : खेळता खेळता अचानक गायब झाली चिमुकली; सीसीटीव्ही फुटेज पाहून आई-वडिलांना धक्काच बसला!

मनदीप तुफान आणि मनमोहन, अशी मृत्युमुखी पडलेल्या आरोपींची नावे आहेत. तर केशव असं गंभीर जखमी झालेल्या आरोपीचं नाव आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुंड मनदीप सिंग तुफानची कारागृहातील कैद्यांशी काही कारणावरून भांडण (Crime News) झाले होते. यानंतर कैद्यांनी त्याला बेदम मारहाण केली.

या मारहाणीत मनदीप तुफान, मनमोहन आणि केशव हे देखील यांचा जागीच मृत्यू झाला. तर केशव हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृत तूफान हा सिद्धू मूसवाला खून प्रकरणातील आरोपी होता. याच प्रकरणी मनदीप तुफान याला पोलिसांनी गँगस्टर मनी रियासह अटक केली होती.

तुफानला तरनतारनच्या वैरोवाल ठाणे अंतर्गत खाख गावातून अटक करण्यात आली होती. गँगस्टर मनदीप तुफान जग्गू हा भगवानपुरिया टोळीचा शार्प शूटर होता. जग्गू भगवानपुरियाची चौकशी केल्यानंतर त्याचे नाव मूसवाला खून प्रकरणात समोर आले होते.

Sidhu Moose Wala Case
Solapur Crime : चारित्र्याच्या संशयावरून पतीने कापला पत्नीचा कान, सोलापुरातील संतापजनक घटना

गँगस्टर मनमोहन आणि केशव हेही मूसवाला खून प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. याच प्रकरणातील आरोपींना देखील  पोलीसांनी (Police)अटक केली असून तपास सुरू आहे. सिद्धू मुसेवाला याची मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

आप सरकारनं सुरक्षा काढून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती. मागच्या वर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला याने मानसा जिल्ह्यातून काँग्रेस कडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंघला यांनी पराभव केला होता.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com