Dawood Ibrahim: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमला मुंबई पोलिसांचा दणका; आणखी एका साथीदाराला परदेशातून अटक

Dawood Ibrahim Gang Member Arrested: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमला मुंबई पोलिसांनी आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
Underworld don Dawood Ibrahim's relative Nazir Mohammad Faki arrested by Mumbai Police Crime Branch
Underworld don Dawood Ibrahim's relative Nazir Mohammad Faki arrested by Mumbai Police Crime BranchSaam TV

Dawood Ibrahim Gang Member Arrested: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमला मुंबई पोलिसांनी आणखी एक मोठा धक्का दिला आहे. दाऊदचा नातेवाईक नझीर मोहम्मद फकी याच्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. १९९२ मध्ये मुंबईतील जे.जे रुग्णालयात झालेल्या गोळीबारात नझीर मोहम्मद हा प्रमुख आरोपी होता. (Latest Marathi News)

Underworld don Dawood Ibrahim's relative Nazir Mohammad Faki arrested by Mumbai Police Crime Branch
Beed Accident: बीड-परळी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कंटनरने रिक्षाला उडवलं; आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू

सोमवारी (११ सप्टेंबर) तपास यंत्रणांनी त्याला परदेशातून अटक केली आहे.लवकरच त्याला भारतात आणले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे नझीर मोहम्मद हा गेल्या तीन दशकांपासून पोलिसांना चकमा देत होता.

त्याचे कुठलेही छायाचित्र उपलब्ध नव्हते, असं असून सुद्धा तपास यंत्रणांनी माहितीच्या आधारे नझीरचा शोध घेत त्याला अटक केली आहे. पोलिस सूत्रांनी (Police Sources) दिलेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमने त्याची बहीण हसिना पारकरचा पती इस्माईल पारकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नझीरचा वापर केला होता.

Underworld don Dawood Ibrahim's relative Nazir Mohammad Faki arrested by Mumbai Police Crime Branch
Washim News: महाराष्ट्राच्या जवानाला लेहमध्ये वीरमरण; ११ वर्ष भारतमातेची सेवा, वाशिम जिल्ह्यावर शोककळा

मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नझीर मोहम्मद हा परदेशात लपून बसल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर, मुंबई गुन्हे शाखेने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी करण्यासाठी अर्ज केला.

त्यानंतर फकीच्या नावाने रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. सोमवारी त्याला परदेशातून अटक करण्यात आली आहे. लवकरच फकीला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com