Washim News: महाराष्ट्राच्या जवानाला लेहमध्ये वीरमरण; ११ वर्ष भारतमातेची सेवा, वाशिम जिल्ह्यावर शोककळा

Washim News Today: भारतीय सैन्यदलात कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला लडाखमधील लेहमध्ये वीरमरण आलंय.
Washim Shirpur jawan akash adhagale martyred in leh ladakh due to physical injury
Washim Shirpur jawan akash adhagale martyred in leh ladakh due to physical injurySaam TV

मनोज जयस्वाल, साम टीव्ही

Washim News Today: भारतीय सैन्यदलात कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला लडाखमधील लेहमध्ये वीरमरण आलंय. आकाश आढागळे (वय ३१) असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे. आकाश गेल्या ११ वर्षापासून भारतीय सैन्यदलात आपले कर्तव्य बजावत होते. त्यांच्या मृत्युमुळे आढागळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)

Washim Shirpur jawan akash adhagale martyred in leh ladakh due to physical injury
Beed Accident: बीड-परळी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कंटनरने रिक्षाला उडवलं; आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू

आकाश आढागळे हे वाशिम जिल्ह्यातील (Washim News) शिरपूर गावचे सुपुत्र होते. लेहमध्ये कर्तव्य बजावत असताना ८ सप्टेंबर २०२३ रोजी एका दुर्घटनेमध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सैन्यदलाच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

दुर्घटनेमध्ये आकाश यांच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या होत्या. उपचारादरम्यान रविवारी (१० सप्टेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. आकाश यांच्या पश्चात त्यांची पत्नी रुपाली आढागळे, ४ वर्षाची तनवी नावाची मुलगी, आई विमलबाई आढागळे आणि दोन भाऊ नितीन आढागळे व उमेश अडागळे असा परिवार आहे.

Washim Shirpur jawan akash adhagale martyred in leh ladakh due to physical injury
Jayakwadi Water Level: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ; मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटणार?

शहीद आकाश यांचे मोठे भाऊ नितीन सध्या सीमा सुरक्षा दलात (BSF) कार्यरत आहेत. धाकटे बंधू उमेश हे महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये कार्यरत आहेत. तीनही भावंड देश सेवेमध्ये कार्यरत आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असताना देखील कठोर परिश्रम घेत आकाश यांनी २०११ मध्ये इंडियन आर्मीत प्रवेश मिळवला होता.

तब्बल ११ वर्ष त्यांनी देशाची सेवा केली. मात्र, कर्तव्य बजावत असतानाच त्यांना वीरमरण आलं. दरम्यान, आकाश यांचं पार्थिव मंगळवारी म्हणजेच १२ सप्टेंबरला त्यांच्या जन्मभूमी शिरपूर येथे आणल्या जाणार आहे. तिथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com