Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : करण वीरच्या वागण्याने शिल्पाला आले रडू, मैत्रीत पडणार फूट?

Shilpa Shirodkar- Karan Veer Mehra : बिग बॉसचा गेम शेवटच्या टप्प्यावर आला आहे. मात्र घरातील भांडणे आणि वाद कमी होत नाही. आता पुन्हा शिल्पा आणि करण वीरमध्ये वाद झाला आहे.

Shreya Maskar

बिग बॉसचा खेळ आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. 19 जानेवारीला बिग बॉसचा फिनाले पाहायला मिळणार आहे. आताही बिग बॉसच्या घरात खूप भांडणे आणि राडा होताना पाहायला मिळत आहे. अलिकडेच कशिश कपूर ही बिग बॉसच्या घरातून बाहेर गेली. तिच्या बाहेर जाण्यामुळे अनेकांना वाईट वाटले. बिग बॉसच्या घरात नुकताच नॉमिनेश टास्क पार पडला.

नुकताच बिग बॉसने शोचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. यात करण वीर आणि शिल्पामध्ये थोडा वाद होताना पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये करण वीरच्या बोलण्याने दुखावून शिल्पा रडताना पाहायला मिळत आहे. करण वीर शिल्पाला बोलतो की, तुला मला मित्र बोलण्यास लाज वाटते का? "मी ५० दिवस करणला देत आहे आणि त्यासाठी विवियनला ३ दिवस सॉरी बोलत आहे. माझ्य मत स्पष्ट आहे. मी कोणाला स्वतःला गृहित धरायला देणार आहे. मी ही तळ्यात-मळ्यात असलेली मैत्री ठेवणार नाही. "

बिग बॉसच्या घरात विवियन डिसेना आणि करण वीर मेहरामध्ये शोच्या पहिल्या दिवसापासून भांडणे होताना पाहायला मिळत आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये करण विवियनला म्हणतो की,"'तू मित्र आहे की शत्रू, हे अद्याप कळलेले नाही. पण तुझ्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहे." यावर विवियन डिसेना विचारतो की, "जर सॉफ्ट कॉर्नर आहे तर 'वीकेंड का वार'ला का नाही बोलास" यावरून अजूनही विवियन आणि करण वीरमधील वाद न मिटल्याचे पाहायला मिळत आहे.

घरातील हे बदलते समीकरण शिल्पा शिरोडकर आणि करणवीर मेहराच्या मैत्रीत फूट पाडेल का? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. आता 'वीकेंड का वार' बिग बॉसच्या घरात सलमान खान कोणाची शाळा घेणार आणि कोणाचे कौतुक करणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. हा खेळ शेवटच्या टप्प्यावर आल्यामुळे कोण 'बिग बॉस 18' ची ट्रॉफी उचलणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता कधी येणार? आज होणार निर्णय, महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Cabinet Reshuffle: मोठी बातमी! दिवाळीआधी मोदी सरकारमध्ये मोठे फेरबदल, ५ नवीन शिलेदारांना मंत्रिमंडळात संधी

Fort : इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण! डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे 'हा' किल्ला

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! जळगावसाठी धावणाऱ्या गरीब रथ, सेवाग्रामसह ५ गाड्यांचे मार्ग बदलले; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT