Bigg Boss 18  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : मित्र की शत्रू? बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनचा तांडव, सदस्यांना एक चूक पडली महागात

Bigg Boss Nomination Task : बिग बॉसच्या घरात आता नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. घरात कोण कोणाचा मित्र आणि शत्रू याचा खुलासा होणार आहे.

Shreya Maskar

सलमान खानचा 'बिग बॉस 18' (Bigg Boss 18 ) शो आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. यामुळे घरातील प्रत्येक सदस्य नॉमिनेशन प्रक्रियेतून सुरक्षित होण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन आठवड्याला सुरुवात होताच बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. नॉमिनेशन टास्क दरम्यान घरातील सदस्य नियमांचे उल्लंघन करतात.

नॉमिनेशन टास्क दरम्यान झालेल्या नियमांचे उल्लंघनामुळे बिग बॉसने एक टीम नॉमिनेट केले आहे. बिग बॉसने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये असे पाहायला मिळाले की, विवियन डिसेना टाइम मशीनच्या खोलीत दिसतो आणि बाहेर करण वीर मेहरा असतो. करण विवियनला म्हणतो की,"'तू मित्र आहे की शत्रू, हे अद्याप कळलेले नाही. पण तुझ्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहे." यावर विवियन डिसेना विचारतो की, "जर सॉफ्ट कॉर्नर आहे तर 'वीकेंड का वार'ला का नाही बोलास" म्हणजे अजूनही विवियन आणि करणमध्ये मित्र की शत्रू? हा गेम सुरू आहे.

प्रोमोमध्ये त्यानंतर करण ईशा सिंगसोबत बोलतो. करण म्हणतो, "मला माहित आहे की तू गेमर आहेस. तुझ्यासोबत स्टेजवर एखादा स्पर्धक असेल तर तो कोण असावा?" यावर ईशा उत्तर देत करणचे नाव घेते. हा ईशा आणि करणचा नवीन गेम प्लान आहे. की ही दोघे एकमेकांना क्रॉस करणार आहेत. हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

बिग बॉसच्या घरात टाइम मशीनच्या बाहेर अविनाश आणि ईशा असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर चाहतला अविनाश विचारतो की, "चला हिरोबद्दल बोलू...तो कसा आहे?" यावर चाहत 'खूप छान' असे उत्तर देते. टास्कच्या नियमानुसार मागे बसलेल्या सदस्यांना वेळ मोजायची नसते. तरीही सदस्यांकडून वेळ मोजली जाते.

बिग बॉसच्या घरातून नुकतीच कशिश बाहेर पडली आहे. आता 'वीकेंड का वार'ला सलमान खान कोणाची शाळा घेणार आणि कोणाचे कौतुक करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या टास्कमधून कोणती टीम नॉमिनेट झाली हे पाहायला प्रेक्षक आतुर आहेत. बिग बॉसचा गेम आता फक्त दोन आठवड्यांचा उरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT