Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: 'मेरी मर्जी...' म्हणत विवियन अन् अविनाशने घरात घातला धुमाकूळ, 'टाइम गॉड' दिग्विजयच्या तोंडचे पाणी पळाले

Avinash-Vivian Fight With Digvijay: बिग बॉसच्या घरात दिग्विजय सिंह राठी 'टाइम गॉड' झाल्यामुळे भांडणांना सुरूवात झाली आहे. अविनाश आणि विवियनने घरात धुमाकूळ घातला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 18'च्या (Bigg Boss 18) घरात रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस बिग बॉसचा गेम रंगत जात आहे. नुकताच घरात 'टाइम गॉड'चा टास्क पार पडला असून या आठवड्यात 'टाइम गॉड' दिग्विजय सिंह राठी बनला आहे. दिग्विजय 'टाइम गॉड' झाल्यामुळे वादाला नवा विषय मिळाला आहे.

बिग बॉसच्या 'टाइम गॉड'च्या टास्कमध्ये पुरुषांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. ज्यात सर्व पुरुष सदस्यांना जेलमध्ये टाकण्यात आले होते आणि महिला सदस्य त्यांना जेलमधून बाहेर काढण्यास टॉचर करताना पाहायला मिळत होत्या. या टास्कमध्ये विवियन डिसेना जेल बाहेर पडला. या टास्कमध्ये अविनाश, करणवीर, दिग्विजय, तजिंदर आणि ईशा हे टाइम गॉडच्या स्पर्धेत शेवटपर्यंत पोहचले. अखेर 'टाइम गॉड' दुसऱ्या टास्कमध्ये दिग्विजय विजयी झाला आणि बिग बॉसच्या सातव्या आठवड्याचा 'टाइम गॉड' बनला.

दिग्विजय सिंह राठी (Digvijay Singh Rathee ) 'टाइम गॉड' झाला हे अविनाश (Avinash Mishra ) आणि विवियनला (Vivian Dsena) मुळीच पटले नाही. त्यामुळे यांनी घरात राडा घातला. अविनाश आणि विवियनने घरातील कामे करण्यास नकार दिला. यावर दिग्विजयने काम न करणाऱ्या सदस्याला जेवण मिळणार नाही असा निर्णय दिला. यामुळे या तिघांमध्ये मोठा राडा झालेला पाहायला मिळाला.

बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात कोण बाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. या आठवड्यात ॲलिस, कशिश, करणवीर,विवियन, दिग्विजय, चाहत, अविनाश हे सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT