Bigg Boss 17  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'बिग बॉस १७'च्या स्पर्धकांना झटका, एलिमेशनमध्ये येणार मोठा ट्विस्ट; घराबाहेर जाणारा हा सदस्य?

Bigg Boss 17 New Promo: यापुढे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा स्पर्धकाचा मार्ग सोपा नसून ट्विस्ट आणि टर्न्सने भरलेला असणार आहे.

Priya More

Bigg Boss 17 Elimination:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस १७' प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची सततची भांडणं, वाद, प्रेम आणि रुसवे-फुगवे प्रेक्षकांना आवडत आहे. बिग बॉसचे निर्माते दरवेळी काहीना काही नवीन करण्याचा प्रयत्न करतात. दर आठवड्याला बिग बॉसच्या घरातून एका स्पर्धकाला घराबाहेर जावे लागते. पण आता यापुढे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा स्पर्धकाचा मार्ग सोपा नसून ट्विस्ट आणि टर्न्सने भरलेला असणार आहे. यावेळीही असेच काहीसे होणार आहे.

'बिग बॉस १७' चा रविवारचा एपिसोड खान बंधू म्हणजेच अरबाज खान आणि सोहेल खान हे होस्ट करताना दिसले. तर, सलमान खान सोमवार ते शनिवार एपिसोड होस्ट करताना दिसतो. यावेळी एपिसोडमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलेली व्हीआयपी ट्रीटमेंट समोर आली. ज्यामुळे घरातील सदस्य बिग बॉसवर नाराज झाले आहेत. पण हे इथेच संपते असे वाटत नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, यावेळी शॉकिंग एविक्शन होणार आहे.

'बिग बस १७' चा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यामध्ये स्पर्धकांना घराबाहेर जाण्यासाठी एका स्पर्धकाचे नाव सांगायचे आहे. जिग्ना व्होरा नीलचे नाव घेते. घरामध्ये नीलचे फारसे योगदान नाही, असे तिचे म्हणणे आहे. यानंतर, बिग बॉस लिव्हिंग एरियातील घरातील सदस्यांना कॉल करतात आणि त्यांना सांगतात की, तीन सदस्यांपैकी एकाला लवकरच बाहेर काढले जाईल. हे ऐकून स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील रंग उडतात.

'बिग बॉस १७'चे क्षणोक्षणी अपडेट्स देणाऱ्या द खबरी पेजनुसार, यावेळी नावेद सोलचे कार्ड शोमधून काढून टाकले जाईल. हा आठवडा त्याचा शोमधील शेवटचा प्रवास असेल. बिग बॉस १७ मध्ये फॉरमॅटमध्ये काही बदल दिसू शकतात. शोमध्ये आणखी काही स्पर्धकांची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT