Salman Khan Security Breaches Saam tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: 'सलमानने मला फोन केला... मी त्याला ओळखते'; सलमान खानच्या घरात घुसलेल्या महिलेचा खळबळजनक दावा

Salman Khan Security Breaches: सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेने पोलिसांना सांगितले की ती सलमान खानला ओळखते. सलमानने तिला फोन केला होता.

Shruti Vilas Kadam

Salman Khan Security Breaches: गुरुवारी सकाळी मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयास्पद महिलेला अटक केली. या ३६ वर्षीय महिलेचे नाव ईशा छाब्रा आहे, जी बुधवारी रात्री उशिरा सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जबरदस्तीने घुसली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला लिफ्टने सलमान खानच्या फ्लॅटवर पोहोचली आणि तिथे पोहोचल्यानंतर तिने त्याच्या फ्लॅटचा दरवाजाही ठोठावला.

सलमान खानला ओळखत असल्याचा दावा

इंडिया टुडेशी बोलताना एका पोलिस सूत्राने सांगितले की, २१ मेच्या पहाटे ३ वाजता घडली, जेव्हा ईशा छाब्रिया (३६) नावाच्या मॉडेलने गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला आणि सलमान खानच्या घराच्या दारावर थाप दिली. तिने पोलिसांना सांगितले की, ती सलमान खानला सहा महिन्यांपासून ओळखते आणि त्यानेच तिला घरी बोलावले होते. मात्र, सलमान खानच्या कुटुंबीयांनी हे दावे फेटाळले. पोलिसांनी ईशा छाब्रिया यांच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला

याआधी २० मे रोजी एका व्यक्तीने सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. या व्यक्तीला सुरक्षा रक्षकाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर, २१ मे च्या रात्री, महिलेने सलमान खानच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी पोलिसांनी तिला अटक केली. पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

या दोन्ही घटनांमुळे सलमान खानच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याला पूर्वीही धमक्या मिळाल्या असल्यामुळे त्याला Y+ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनांची सखोल चौकशी सुरू केली असून, आरोपींच्या हेतूंचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट, पुढी तीन तास धो धो कोसळणार

Shravan Shanivar: श्रावणात शनिवारी अवश्य करा हे 3 उपाय, शनिदेव होतील प्रसन्न

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या पैशांवर पुरुषांचा 'डल्ला'! 14 हजार पुरुषांनी लाटले 21 कोटी| VIDEO

दलित तरुणाला विवस्त्र करत बेदम मारहाण, खामगावात संतापजनक प्रकार

Bhoplyachi Puri Recipe : श्रावण स्पेशल डिश, गावाकडे बनवतात तशी खुसखुशीत भोपळ्याची पुरी

SCROLL FOR NEXT