Salman Khan House Firing Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगच्या तिघांना अटक, चंदीगढ कनेक्शनही उघड

Salman Khan House Firing Update : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात आज चंदीगढ पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिश्नोई गँगच्या तीन सदस्यांना अटक केली आहे.

Chetan Bodke

>> सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी, मुंबई

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. आज चंदीगढ पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिश्नोई गँगच्या तीन सदस्यांना अटक केली आहे.

आतापर्यंत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या सहा आरोपींना अटक केलेली आहे. विक्की चौधरी, सागर पाल, सोनू चंदर, अनुज थापन आणि मोहम्मद चौधरी असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे नाव आहेत. पण यातील सहाव्या आरोपीची ओळख पटू शकलेली नाही. अशातच आता चंदीगढ पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिश्नोई गँगच्या तीन सदस्यांना अटक केली आहे. गोळीबार प्रकरणामध्ये शुटर्सना मदत करण्याच्या संशयावरून त्यांना अटक केलेली आहे.

रवींद्र सिंह, करण कपूर आणि जावेद झिंझा असे आरोपींची नावं आहेत. या तिनही आरोपींवर पंजाब, राजस्थान आणि चंदीगडमध्ये सहा गुन्हे दाखल आहेत. हे सर्व आरोपी वर्च्युअल नंबर आणि मोबाईल ॲप्लिकेशनच्या मदतीने एकमेकांच्या संपर्कात होते. बिश्नोई गँगच्या या तीनही सदस्यांना चंदीगढ पोलिसांनी अटक केलेली असून लवकरच त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. अभिनेता सलमान खानच्या घरावर १४ एप्रिलला पहाटे विक्की चौधरी आणि सागर पाल या दोन आरोपींनी गोळीबार केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

SCROLL FOR NEXT