Salman Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan : प्रेम, धोका, ब्रेकअप अन् Move On; भाईजाननं दिलं पुतण्याला रिलेशनशिपचे धडे, म्हणाला - जखमांवरील बँड-एड

Salman Khan-Arhaan Khan : बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानने अरहान खानला रिलेशनशिपवर टिप्स दिल्या आहेत. नेमकं भाईजान काय म्हणाला, जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूडचा भाईजान कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतो. त्याने आपल्या स्टाइलने चाहत्यांना वेड लावले आहे. सलमान खानचा (Salman Khan ) मोठा चाहतावर्ग आहे. त्याचे लव्ह लाईफ कायमच चर्चेचा विषय असते. त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. मात्र अद्यापही सलमान खानने लग्न केले नाही. सलमानचे नाव बॉलिवूडच्या सुपरस्टार ऐश्वर्या राय, कतरिना कैफ अशा अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे.

नुकताच सलमान खानची एक मुलाखत सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या मुलाखतीत सलमान खान आपल्या लाडक्या पुतण्याला रिलेशनशिप टिप्स देताना पाहायला मिळत आहे. अरहान खान (Arhaan Khan) आणि सलमान खानमध्ये प्रेम, रिलेशनशिप आणि ब्रेकअपवर चांगल्याच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. सलमानने अरहानला नातेसंबंधांवर सल्ला दिला.

मिडिया मुलाखतीत सलमान खान म्हणाला की,"जर तुमचे गर्लफ्रेंड ब्रेकअप झाले असेल तर तिला जाऊ दे. ब्रेकअप झाल्यानंतर आपण जखमांवरील बँड-एड हळूहळू न काढता ते पटकन काढतो. त्याचप्रमाणे एका रुममध्ये जा आणि खूप रडा तो विषय कायमसाठी संपवा. आयुष्यात लवकर पुढे जा. ब्रेकअपनंतर स्वतःच्या भावना अनुभवा. मात्र बाहेरून सामान्य जसे काही झाले नसल्यासारखे रहा."

पुढे भाईजान म्हणाला, "जर तुमची नात्यात फसवणूक झाली असेल तर त्या रिलेशनशिपमधून त्वरित बाहेर या. तुम्ही रिलेशनशिपमध्ये किती काळ आहात याचा फरक पडत नाही. असे कोणत्याही नात्यात आणि मैत्रीत घडू शकते. तुमच्यात 30 सेकंदात त्या परिस्थितीतून बाहेर येण्याची ताकद असली पाहिजे. तो वाइट काळ पुसून टाका. आपली चूक संकोचाशिवाय स्वीकारून मनापासून माफी मागा. कोणत्याही संकटात किंवा अडचणीत स्वतःचे ध्येय विसरू नका. त्यावर लक्ष केंद्रित करा. अडचणीपासून पळून जाऊ नका. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT