Iulia Vantur Saam Tv
मनोरंजन बातम्या

सलमान खानची गर्लफ्रेंड यूलिया वंतूरचा युक्रेनला पाठिंबा, पुतिन यांना म्हटले क्रिमिनल

यासाठी रशियाच्या जनतेला दोष देणे योग्य नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची (Salman Khan) कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूर हिने युक्रेनचे (Ukraine) समर्थन करत रशियाला (Russia) हुकूमशहा म्हटले आहे. युलिया वंतूर ही युक्रेनच्या शेजारी देश रोमानियाची नागरिक असून सलमान खानसोबतच्या रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे ती बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. सलमान खान आणि यूलिया वंतूर या दोघांनीही अद्याप या नात्याला दुजोरा दिलेला नसला तरी दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळातही यूलिया आणि सलमान खान पनवेलच्या फार्महाऊसवर एकत्र राहत होते.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात यूलिया वंतूरने युक्रेनला पाठिंबा दिला आहे. यूलियाने पुतीन यांच्याप्रती नाराजी व्यक्त केली आहे. जे काही चालले आहे ते गंभीर असून युद्ध हा पर्याय असू शकत नाही असे म्हटले आहे. रुमानियाच्या यूलिया वंतूरने इंस्टाग्रामवर रशिया-युक्रेन वादाचे फोटो पोस्ट केले आहे. या फोटोत एक रशियन पुरुष एका महिलेला मिठी मारताना दिसत आहे. तसेच त्याच्या हातात एक फलक आहे. त्यावर लिहिलं आहे की, "मी रशियन आहे, पण तुमच्यासोबत जे काही घडले त्याबद्दल मी तुमची माफी मागते. असे फोटो शेअर करत यूलिया वंतूरने लिहिले, 'पुतीन सारखे हिंसक, हुकूमशहा आणि युद्धपापी रशियाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. यासाठी रशियाच्या जनतेला दोष देणे योग्य नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT