Bigg Boss 20 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

Bigg Boss 20: बिग बॉस २०चा प्रीमियर आज होणार असून सलमान खान पुन्हा सूत्रसंचालन करणार आहे. यंदाच्या सीझनसाठी त्याच्या मानधनाची मोठी चर्चा असून स्पर्धकांची नावेही चर्चेत आहेत.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 20: बिग बॉसच्या २०व्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर ६ सप्टेंबर रोजी रंगला आहे. हिंदी बिग बॉसच्या या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा अभिनेता सलमान खान करत आहे. त्यामुळे शोच्या स्पर्धकांइतकीच चर्चा सलमानच्या मानधनाचीही होत आहे. सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉसचा चेहरा राहिला असून, त्याच्या लोकप्रियतेमुळे शोच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी भर पडते.

बिग बॉस २०साठी सलमानचे किती मानधन?

सलमान खान अनेक वर्षांपासून बिग बॉसच्या हिंदीचा चेहरा आहे. त्यामुळे प्रत्येक सीझनपूर्वी त्याच्या मानधनाबाबत चर्चा रंगते. ‘एबीपी मराठी’च्या वृत्तानुसार, सलमान खानला बिग बॉस २०च्या संपूर्ण सीझनसाठी तब्बल १२० कोटी रुपये मानधन मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या रकमेची सलमान खान किंवा शोच्या निर्मात्यांकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. सलमानने बिग बॉसचे सूत्रसंचालन सुरू केले तेव्हा त्याचे मानधन तुलनेने कमी होते. सुरुवातीच्या सीझनमध्ये त्याला प्रति एपिसोड सुमारे २.५ कोटी रुपये मिळत असल्याचे वृत्त होते. शोची लोकप्रियता वाढत गेली आणि सलमान या फ्रँचायझीचा महत्वाचा भाग बनला, तसतसे त्याच्या मानधनातही मोठी वाढ झाल्याचे सांगितले जाते.

बिग बॉस १७ आणि १८साठीही कोट्यवधींचे मानधन

माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘बिग बॉस १७’साठी सलमानला सुमारे २०० कोटी रुपये मानधन मिळाल्याचे सांगितले गेले होते. त्यानंतर ‘बिग बॉस १८’साठी ही रक्कम वाढून सुमारे २५० कोटी रुपये झाल्याचेही वृत्त समोर आले होते. मात्र, या सर्व आकडेवारीची अधिकृत माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

बिग बॉस २०ची खासियत

हा सीझन आणखी रोमांचक बनवणारी गोष्ट म्हणजे या वर्षी स्पर्धकांना अतिरिक्त लाइफलाइन मिळेल. प्रत्येक स्पर्धकाला ‘वरदान’ किंवा ‘जीवनदान’ जिंकण्याची समान संधी मिळेल. शोमध्ये कोणत्या स्पर्धकांना अतिरिक्त लाइफलाइन मिळेल हे ठरवण्यासाठी घरात उपस्थित असलेली ‘2X रूम’ महत्त्वाची भूमिका बजावेल. आता आम्ही तुम्हाला त्या स्पर्धकांबद्दल सांगतो जे यावेळी शोचा भाग होऊ शकतात.

बिग बॉस २०मध्ये कोण स्पर्धक?

यंदाच्या सीझनमध्ये कनिका मान, आम्रपाली दुबे, अरिशफा खान, माही विज, आसिफ खान, गुल्लू उर्फ कुशल तंवर, ईशा रिखी, लव गिल, रिया अहीर, उदिति सिंह, यंग डीएसए, मैरी कॉम, अमन गांधी, रोहेद खान, रीति तिवारी हे कलाकार असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; दोन डॅशिंग महिला अधिकाऱ्यांना दिली मोठी जबाबदारी

Liver Health : लिव्हर आणि किडनीचं या ७ सवयींमुळे होतं नुकसान; वेळीच सावध व्हा

Hair Fall: शॅम्पू लावताच तुमचे केस गळू लागतात? 'या'५ सवयी ठरतात कारणीभूत

तुरूंगात असताना माझ्यावर विषप्रयोगाचा संशय, राऊतांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ

Fact Check: डिजेविरोधी बापटांचाच डीजेवर डान्स? काय म्हणता, बापट डीजेवर नाचले?

SCROLL FOR NEXT