Famous Choreographer SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Choreographer : "माझ्यासोबत एक रात्र घालव, मला तुझ्यापासून मुल हवंय..." ; महिला चाहतीची ऑफर, प्रसिद्ध कोरिओग्राफर झाला थक्क

Famous Choreographer Female Fan Wanted To Sleep With Him : प्रसिद्ध कोरिओग्राफरने एक मोठा खुलासा केला आहे. एका चाहतीने त्याच्याकडे विचित्र इच्छा व्यक्त केली, जी ऐकून कोरिओग्राफर थक्क झाला.

Shreya Maskar

प्रसिद्ध कोरिओग्राफरकडे चाहतीची विचित्र मागणी

कोरिओग्राफर लोकप्रिय रिॲलिटी शो 'डान्स इंडिया डान्स' चा परीक्षक होता

प्रसिद्ध कोरिओग्राफरने सलमान खानसोबतही काम केले आहे

चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्याची, त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा असते. यासाठी चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्याची संधी शोधतात आणि क्यूट क्षण कॅमेरात कैद करतात. पण काही चाहते खूपच विचित्र असतात आपण अनेक वेळा अतरंगी किस्से ऐकत असतो. अशात आणखी एक किस्सा समोर आला आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शकाकडे त्याची चाहती एक विचित्र मागणी करते, जे एकूण कोरिओग्राफर थक्क होतो.

'फिल्मीज्ञान'शी बोलताना लोकप्रिय रिॲलिटी शो 'डान्स इंडिया डान्स' चे परीक्षक मुदस्सर खानने आपल्या चाहती महिलेची विचित्र ऑफर बद्दल सांगितले. मुदस्सर म्हणाला की, "मला आलेली सर्वात विचित्र ऑफर एका महिला चाहत्याची होती, जिने मला तिच्यासोबत रात्र घालवण्यास सांगितले कारण तिला माझ्यासोबत मुल हवे होते...हे ऐकूण मी थक्क झालो..."

पुढे मुदस्सर म्हणाला की, "मी ज्या चाळीत राहत होतो, तिथे एका मुलीने फक्त मला पाहण्यासाठी माझ्या घरासमोर घर भाड्याने घेतले होते... हे पाहून तिथल्या लोकांनी मला विचारले की, 'ही कोण आहे?'" त्यानंतर मुदस्सर म्हणाला, "मी त्या मुलीच्या घराच्या भिंतींवर माझे फोटो पाहिले. ती सतत त्याचे नाव घेत असे. मग एक दिवशी कंटाळू मी तिला निघून जाण्याची विनंती केली..."

सलमान खानच्या चित्रपटातून मिळाली ओळख

कोरिओग्राफर मुदस्सर खानने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत काम केले आहे. यामुळे मुदस्सर खानच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. २०१० मध्ये रिलीज झालेल्या 'दबंग' मध्ये मुदस्सरने सलमान भाईसोबत काम केले. 'हमका पीनी है' या गाण्यामुळे मुदस्सरला खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर बॉडीगार्ड आणि रेडी चित्रपटातही मुदस्सरने डान्स कोरिओग्राफ केला. त्याची 'ढिंका चिका' आणि 'पांडे जी सीटी' गाणी गाजली. सलमान खानचा आगामी चित्रपट 'मातृभूमी' मध्ये देखील मुदस्सर सलमान खानसोबत नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गाडीचं तिकीट मिळालं नाही? चिंता सोडा! कोकणात जाणाऱ्यांसाठी ३४ स्पेशल गाड्या; वेळापत्रक पाहाच

Vanilla Ice Cream: बाजारातील आईस्क्रीम विसरा, घरी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट व्हॅनिला आईस्क्रीम; वाचा रेसिपी

Pune : भीषण स्फोटाने खळबळ! पिंपरी-चिंचवड शहराचा वीजपुरवठा खंडित; पाहा नक्की काय घडलं

राजधानीत थरारक घटना! 5 मजली इमारत कोसळली; 50 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

SCROLL FOR NEXT