Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या जिवलग मित्र सुशील कुमार यांच्या निधनानंतर आणखी एका जवळच्या मैत्रिणीचे निधन झाले आहे. मंगळवारी सलमानने आपल्या कुटुंबासह मैत्रिणी कुमुद राणे यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली. यावेळी सलमानसोबत त्याची आई सलमा खान, भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान देखील उपस्थित होते. कुमुद राणे यांच्या अंत्यसंस्कारावेळी सलमान भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
कुमुद राणे या खान कुटुंबाच्या अत्यंत जवळच्या होते. त्यांच्या निधनामुळे खान कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी सलमान शांत आणि इमोशनल झाला. आपल्या जवळच्या व्यक्तीला अखेरचा निरोप देताना त्याला अश्रू अनावर झाले.
गेल्या महिन्यातही सलमान खानला एक मोठा धक्का बसला होता. त्याचा जिवलग मित्र सुशील कुमार यांचे निधन झाले होते. या दुःखद घटनेनंतर सलमानने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. सुशील कुमार हे त्याच्यासाठी केवळ मित्र नव्हते, तर भावासारखे होते, त्यांची ४२ वर्ष जुनी मैत्री होती असे त्याने म्हटले होते.
सुशील यांच्या आठवणींना उजाळा देताना सलमानने स्वतःचा, वडील सलीम खान आणि सुशील कुमार यांचे काही जुने फोटोही शेअर केले होते. त्या पोस्टमध्ये त्याने सुशील यांचे वर्णन अत्यंत दयाळू, मदत करणारे आणि सकारात्मक व्यक्तिमत्त्व म्हणून केले होते. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य कधीच कमी झाले नाही, असेही सलमानने लिहिले होते. मात्र महिनाभरात दोन जवळच्या व्यक्तींना गमावल्यामुळे अभिनेता भावनिकदृष्ट्या खचलेला जाणवत आहे.
कामाबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान त्याच्या आगामी ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘सलमान खान फिल्म्स’च्या बॅनरखाली होत असून दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहेत. चित्रपटात अभिनेत्री चित्रांगदा सिंग महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.