Actor Sold Property Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Sold Property: सलमानचा भाऊ अरबाज खानने विकला आलिशान फ्लॅट; मिळाले कोट्यवधी रुपये

Actor Sold Property: सलमान खानचा भाऊ, अरबाज खानने मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे असलेला १,३६९ चौरस फुटांचा एक फ्लॅट विकला आहे. यापूर्वी, अरबाजने जोगेश्वरी भागात २.७८ कोटी रुपयांना एक फ्लॅट खरेदी केला होता.

Shruti Vilas Kadam

Actor Sold Property: बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान सध्या त्यांच्या रिअल इस्टेट व्यवहारामुळे चर्चेत आले आहेत. सलमान खानचा भाऊअरबाजने मुंबईत एक आलिशान फ्लॅट तब्बल ६.५ कोटी रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे.

प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कागदपत्रांनुसार, हा फ्लॅट मुंबईतील अंधेरी वेस्ट परिसरातील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील Runwal Elegante या प्रोजेक्टमध्ये होता. हा व्यवहार ५ मे २०२६ रोजी अधिकृतपणे नोंदवण्यात आला.

हा फ्लॅट सुमारे १,३६९ स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचा असून त्यात दोन कार पार्किंगची सुविधा देखील होती. या व्यवहारासाठी खरेदीदारांनी सुमारे ३९ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचेही समोर आले आहे.

अंधेरी वेस्ट हा मुंबईतील सर्वाधिक मागणी असलेला भाग आहे. विशेषतः चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि व्यावसायिकांसाठी हा परिसर लोकप्रिय असल्याने येथे मालमत्तेची किंमत सातत्याने वाढताना दिसते.

विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच अरबाज खानने नवीन घर खरेदी केले होते. फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांनी जोगेश्वरी परिसरात सुमारे २.७८ कोटी रुपयांना एक नवीन फ्लॅट घेतला होता. हा फ्लॅट २७व्या मजल्यावर असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे १,२४३ स्क्वेअर फूट आहे.

अरबाज खानची एकूण संपत्ती

अरबाज खान मुंबईमध्ये आपल्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओचा (स्थावर मालमत्तेचा) विस्तार करत आहे. या प्रयत्नांमध्ये त्याची पत्नी शूरा खान त्याला पूर्ण सहकार्य करते. त्याच्या एकूण संपत्तीचा विचार करता, 'GQ' च्या एका अहवालानुसार, अरबाज खानची एकूण संपत्ती ५०० कोटी रुपयांच्या घरात आहे. चित्रपट निर्मिती हा त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. अरबाजने जरी फारशा चित्रपटांमध्ये अभिनय केला नसला, तरीही तो चित्रपट निर्मिती आणि विविध व्यावसायिक उपक्रमांतून मोठी कमाई करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्य सरकारने माहितीच्या अधिकारात बदल

या 5 चुकांमुळे चेहऱ्यावर येतात पिंपल्स

ठाकरेसेनेचा व्हीप फुटीर खासदारांनी झुगारला, बंडखोर खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

Friday Horoscope: अनोळखी लोकांवर लगेच विश्वास ठेवणं टाळा; वाचा आजचं राशीभविष्य

Famous Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचं ३६ व्या वर्षी निधन; पोटाच्या कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT