Arbaaz Khan saam tv
मनोरंजन बातम्या

Arbaaz Khan : मोजके सिनेमे करूनही अरबाज खान मालामाल; मुंबईत घेतला आलिशान फ्लॅट, सलमानच्या भावाचा स्वॅगच भारी

Arbaaz Khan Buys Property : सलमान खानचा भाऊ अरबाज खानने मुंबईत आलिशान फ्लॅट घेतला आहे. मोजके सिनेमे करूनही अरबाज कोट्यवधींचा मालक आहे.

Shreya Maskar

अरबाज खानने मुंबईत आलिशान घर घेतले आहे.

अरबाज खान आजवर खूप मोजक्या चित्रपटांमध्ये झळकला आहे.

अरबाज खान जवळपास 500 कोटींचा मालक आहे.

सलमान खानचा भाऊ अरबाज खान कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत असतो. अशात आता अरबाज खान एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अरबाज खानने मुंबईत आलिशान मालमत्ता खरेदी केली आहे. अरबाजने जोगेश्वरी येथे एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. अरबाज खान एक अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. त्याने खूप मोजकेच चित्रपट केले आहे. तरी तो कोट्यवधींचा मालक आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अरबाज खानने जोगेश्वरी येथे 2.78 कोटींना लग्जरी अपार्टमेंट खरेदी केले आहे. हा व्यवहार महिन्याच्या सुरुवातीला अधिकृतपणे नोंदणीकृत झाला होता. अरबाजचे नवीन अपार्टमेंट जोगेश्वरी पश्चिमेमध्ये आहे. हा एरिया सध्या वेगाने विकसित होत आहे. ही मालमत्ता लिंक रोडवरील ऑटोग्राफ रेसिडेन्सी प्रकल्पाचा भाग आहे. इमारतीच्या 27 व्या मजल्यावर अरबाजने घर खरेदी केले आहे. त्यात 1,243 चौरस फूटचा रेरा कार्पेट एरिया आहे. प्रति चौरस फूट ₹22,000 पेक्षा जास्त दराने विकत घेतल्याचे वृत्त आहे. यात दोन पार्किंग स्पॉट्स देखील आहेत.

कागदपत्रांवरून असे दिसून येते की, अरबाजने 17 फेब्रुवारी 2026 रोजी मालमत्ता खरेदी केली. त्याने 16 लाखपेक्षा जास्त स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार नोंदणी शुल्क भरले. अपार्टमेंट थेट डेव्हलपर, मुतिस्टार बिल्डर्स एलएलपी कडून खरेदी केले गेले. या प्रोजेक्टचे काम सध्या सुरू आहे. डिसेंबर 2030 पर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे बोले जात आहे.

संपत्ती किती?

मीडिया रिपोर्टनुसार, अरबाज खानची एकूण संपत्ती जवळपास 500 कोटींच्या आसपास आहे. अरबाज खान अलिकडेच, 'काल त्रिघोरी' मध्ये दिसला होता. तो लवकरच 'बिहू अटॅक', 'श्रीदेवी बंगलो' आणि 'केसर सिंग' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अरबाज खानने 2023 ला शूरासोबत लग्नगाठ बांधली. दोघांनी 2025 ला गोंडस मुलीचे स्वागत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

America- Iran: मोठी बातमी! अमेरिका-इराण शांतता चर्चा अयशस्वी, इराणला अटी मान्य नाही, आता डोनाल्ड ट्र्म्प काय निर्णय घेणार?

Weight Loss Recipe : झटपट वजन कमी करायचंय? रोज सकाळी करा 'हा' हेल्दी नाश्ता, पोट दीर्घकाळ भरलेले राहील

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीसाठी आजपासून प्रचाराला सुरूवात

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

SCROLL FOR NEXT