Arbaaz Khan Daughter Name : खान कुटुंबात आली प्रिंसेस, अरबाज-शूराने ठेवलं लेकीचं खास नाव

Arbaaz Khan- sshura khan Daughter Name : सलमान खानचा भाऊ अरबाज खानला मुलगी झाली आहे. नुकतेच अरबाज खानने मुलीचे नाव ठेवले आहे. अरबाज-शूरा खानच्या लेकीचे नाव जाणून घेऊयात.
Arbaaz Khan- sshura khan Daughter Name
Arbaaz Khan Daughter Name SAAM TV
Published On
Summary

अरबाज खान आणि शूरा खानला मुलगी झाली आहे.

अरबाज-शूराने लाडक्या लेकीचे नुकतेच बारसं झाले आहे.

5 ऑक्टोबरला शूराने बाळाला जन्म दिला.

सध्या खान कुटुंब चांगलेच चर्चेत आहे. खान कुटुंबात एक प्रिंसेस आली आहे. सलमान खानचा भाऊ अरबाज खान बाबा झाला आहे. अरबाज खान (Arbaaz Khan) आणि शूरा खानला (Sshura khan) मुलगी झाली आहे. वयाच्या 58 वर्षी अरबाज खान पुन्हा एकदा बाबा झाला आहे. ज्यामुळे खान कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहेत. शूरा खान ही अरबाजची दुसरी पत्नी आहे. शूराने 5 ऑक्टोबरला शूराने लेकीला जन्म दिला.

अरबाज-शूराच्या बाळाला पाहायला संपूर्ण खान कुटुंब रुग्णालयात पोहचले. आता शूरा खानला डिस्चार्ज मिळाला असून ती सुखरूप घरी आली आहे. अशात अरबाज-शूराने आपल्या लाडक्या लेकीचे नाव ठेवले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. सध्या अरबाज खान, शूरा खान आणि संपूर्ण खान कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अरबाज-शूराच्या लेकीचे नाव

अरबाज खान आणि शूरा खानने आपल्या पहिल्या बाळाचे नाव सिपारा खान (Sshura Khan ) असे ठेवले आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

अरबाज-शूरा लग्नगाठ

अरबाज खानचे पहिले लग्न मलायका अरोरा 1998 मध्ये झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नाच्या 18 वर्षांनी दोघे वेगळे झाले. त्यानंतर 2023 मध्ये अरबाज खानने शूरा खानसोबत लग्नगाठ बांधली. आता दोन वर्षांनी दोघे आई-बाबा झाले आहेत. अरबाज आणि शूराचे लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आता चाहते अरबाज-शूराच्या बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Arbaaz Khan- sshura khan Daughter Name
Box Office Collection : 'कांतारा' गाजवतोय अख्खं मार्केट; तर 'सनी संस्कारी'च्या कमाईत घट, कलेक्शनचा आकडा किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com