Salman Khan Birthday  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Birthday: एका सिनेमासाठी सलमान घेतो इतके कोटी; पण राहतो १ बीएचके फ्लॅटमध्ये, काय आहे कारण?

Bollywood Superstar Salman Khan Birthday: बॉलिवूडवर वर्चस्व गाजवणारा सलमान हा उद्या बुधवारी ५८ वा वाढदिवस साजरा करणार आहे. चाहत्यांच्या लाडका सलमान हा भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील १ बीएचके फ्लॅटमध्ये राहतो.

Vishal Gangurde

Salman Khan House:

सलमान खानच्या नावाचा बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्यांच्या यादीत सामावेश होतो. सलमानचा भारतासहित जगभर मोठा चाहता वर्ग आहे. बॉलिवूडवर वर्चस्व गाजवणारा सलमान हा उद्या बुधवारी ५८ वा वाढदिवस साजरा करणार आहे. चाहत्यांच्या लाडका सलमान हा भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील १ बीएचके फ्लॅटमध्ये राहतो. त्याचं कारणही खास आहे. (Latest Marathi News)

सलमान खान (Salman Khan) हा बॉलिवूडचा स्टायलिश अभिनेता म्हणून ओळखला जातो. मात्र, सलमानला साध्या राहणीमानाची आवड आहे. सलमान खान हा वांद्रे येथे गॅलक्सी अपार्टमेंटमधील १ बीएचके फ्लॅटमध्ये राहतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एका सिनेमासाठी १०० कोटीहून अधिक मानधन घेणाऱ्या सलमान खानने कपिल शर्माच्या कार्यक्रमात मोठा खुलासा केला होता. सलमानने म्हटलं होतं, 'मला कुटुंबासोबत राहायला आवडतं. त्या घरात राहून कुटुंबाच्या जवळ आहे. मी कधीही मोठ्या घरासाठी खर्च करणार नाही'. सलमानचं संपूर्ण कुटुंब वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहत आहे.

सलमान खानचा मित्र आणि प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडाने मुलाखतीत सांगितलं की, 'मी गेल्या १५ वर्षांपासून सोबत काम करत आहे. त्याला महागड्या वस्तूंची आवड नाही. तो दुसऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतो. मी गेल्या १५ वर्षांपासून त्याच्या संपर्कात आहे. त्याच्यात फार काही बदल झाल्याचे दिसून आलं नाही'.

सलमानच्या घरातील लिव्हिंग एरियामध्ये सोफा आणि डायनिंग टेबल आहे. तसेच त्याच्या घरात व्यायामासाठीही एक छोटीशी जागा आहे. वर्कफ्रंटविषयी बोलायचं म्हटलं तर सलमान खानचा नुकताच एक सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात सलमानची झलक पाहायला मिळाली होती. तर सलमानचा ‘टाइगर 3’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WTC Points Table: भारताच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पाहा भारत कोणत्या स्थानावर?

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

Ladki Bahin Yojana: वेळेवर ₹१५०० मिळत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करा, राज्यातील महिलांची मागणी

Mumbai Metro: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे प्रचंड हाल; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT