Chetan Bodke
सुपरस्टार सलमान खान म्हटलं की डोळ्यांसमोर एक प्रतिमा उभी राहते. त्याला या क्षेत्रात काम करून जवळजवळ ३३ वर्ष झाली. आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त, नेटवर्थबद्दल जाणून घेणार आहोत.
सलमान हा अनेकांचा आवडता सेलिब्रिटी आहे, त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक चाहत्याला जाणून घेण्यास आवडते.
सलमानने 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. त्या चित्रपटासाठी त्याने ११ हजार रुपये मानधन आकारलं होतं.
'बिग बॉस'च्या एका एपिसोडसाठी सलमान खान १२ कोटी रुपये इतके मानधन घेतो. तो बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे.
नुकतंच प्रदर्शित झालेल्या 'टायगर ३'साठी भाईजानने १०० कोटींहून अधिक मानधन त्याने आकारले असल्याची माहिती मिळत आहे.
सलमान खान एका सोशल मीडिया पोस्टसाठी ५० लाख रुपये इतके मानधन आकारतो.
सलमानची एकूण २८५० कोटींची संपत्ती असून त्याचे वार्षिक उत्पन्न २०० कोटी इतके आहे.
सलमानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंट किंमत ११४ कोटी रुपये आहे. तर, सलमानच्या पनवेलमधल्या फार्महाऊसची किंमत ९४ कोटी रुपये आहे.
सलमान खानला आलिशान कारची खूप आवड आहे. त्याच्याकडे बऱ्याच अलिशान कार देखील आहेत.