Salman Khan Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan Video : 'बिग बॉस २०' मध्ये मोठा ट्विस्ट; स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकणार सदस्य, सलमान खानने दिला इशारा, म्हणाला- "तथास्तु-टू"

Salman Khan - Bigg Boss 20 : एका नवीन खास अंदाजात सलमान खान 'बिग बॉस २०' घेऊन येत आहे. 'बिग बॉस २०' चा नवीन प्रोमो आला आहे, ज्यात सलमान खान शोची नवीन थीम स्पष्ट करताना दिसत आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस २०' मध्ये दिसणार सलमान खानचा नवा अंदाज

'बिग बॉस २०' मध्ये यंदा तथास्तु-टू थीम पाहायला मिळणार आहे

'बिग बॉस २०' चा नवा प्रोमो चर्चेत

सध्या सर्वत्र भाईजानच्या 'बिग बॉस २०' ची तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. काही दिवसातच 'बिग बॉस हिंदी २०' सुरू होणार आहे. यंदा बिग बॉसच्या घरात कोण कोणते कलाकार दिसणार याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. अशात आता 'बिग बॉस २०' चा नवीन प्रोमो आला आहे, ज्यात सलमान खान एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस २०' च्या ट्रेलरमध्ये सलमान खानने 'एक्स्ट्रा जीवन दान' (Extra Jeevan Daan) या अनोख्या 'ट्विस्ट'ची ओळख करून दिली, ज्यामुळे यंदा संपूर्ण खेळच बदलला जाणार आहे. ट्रेलरची सुरुवात दोन योद्ध्यांमधील तीव्र लढाईने होते आणि त्यानंतर सलमान खानची दमदार एन्ट्री होऊन तो ही लढाई थांबवतो. "बिग बॉस में मिलेगा, मेरी जान... एक्स्ट्रा जीवन दान," अशी घोषणा करून आणि त्यानंतर आपल्या खास शैलीत "तथास्तु" (Tathas-two) म्हणत, सलमान या सीझनची मुख्य थीम सादर करतो.

'बिग बॉस २०' च्या नव्या थीममधून असे दिसून येते की, जिथे प्रत्येक निर्णयाला अधिक महत्त्व असेल आणि प्रत्येक स्पर्धकाला पूर्वी कधीही न खेळल्यासारखे खेळण्याचे आव्हान पेलावे लागेल. स्पर्धकांना जरी ही अतिरिक्त संधी मिळणार असली, तरी ती नेमकी कधी आणि कशी वापरात येईल, हे या सीझनचे सर्वात मोठे गुपित आहे.

'बिग बॉस २०' कधीपासून सुरू होणार?

सलमान खान होस्ट करत असलेले 'बिग बॉस २०' ६ सप्टेंबरपासून पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kuka Cold Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी बनवा कॅफेसारखी स्वादिष्ट आणि क्रिमी कुक्का कॉफी, वाचा रेसिपी

पुण्यात CBI चा मोठा छापा! MIL अधिकाऱ्याच्या घरातून १.७३ कोटींची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?

Plane Crash: अमेरिकेत भीषण विमान अपघात! घिरट्या घेत जमिनीवर कोसळलं; सहा जणांचा जागीच मृत्यू

Ulhasnagar Firing: उल्हासनगर हादरलं! भरदिवसा रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

Thursday Horoscope: पडणार पैशांचा पाऊस! 4 राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT