Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: सदावर्तेंना सरकार घाबरते? सलमानच्या प्रश्नावर काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? व्हिडीओ पाहाच

Salman Khan-Gunratna Sadavarte : बिग बॉस 18 च्या 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खानसोबत गुणरत्न सदावर्ते हे डायलॉगबाजी करताना दिसले आहेत. त्यांच्यात नेमका काय संवाद होतो जाणून घ्या.

Shreya Maskar

बिग बॉस 18 चा (Bigg Boss 18) पहिला आठवडा पार पडला आहे. पहिल्याचं आठवड्यात गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घातला आहे. तसेच काल बिग बॉसच्या घरात पहिला वीकेंड का वार पार पडत आहे. सलमान खानने (Salman Khan) अनेकांची शाळा घेणार तर काहींसोबत मजा मस्ती करताना पाहायला मिळत आहे. यंदा बिग बॉसच्या घरात खूप तगडे स्पर्धक आहेत. आठवडाभराची मजा 'वीकेंड का वार' मध्ये पाहायला मिळणार आहे.

बिग बॉसचं घर गाजवणारे गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) हे 'वीकेंड का वार'ही गाजवणार आहेत. बिग बॉसच्या घरातील डायलॉग बाजी त्यांनी 'वीकेंड का वार'मध्ये देखील सुरु ठेवली आहे. बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, गुणरत्न सदावर्ते यांच्यात आणि सलमान खान मध्ये डायलॉगची झलक दिसत आहे. सदावर्ते यांची डायलॉग बाजी ऐकून भाईजानला हसू अनावर झालेले पाहायला मिळत आहे.

सलमान खान सदावर्तेंना म्हणतो की, "सरकार खरंच तुम्हाला घाबरते का?" त्यावर सदावर्तेंनी उत्तर देत म्हणाले की, "मैं जब कहता हूं बंबई चालू, तो बंबई चालू होती है. अभी मेरी चलती है क्योंकि मैं डंके की चोट पर बोलता हूं." हे ऐकून सलमानला हसू अनावर होते. यावर सलमान बोलतो की, "गुणरत्न खुश हुआ" हे ऐकताच सदावर्ते हे मोठ्याने हसू लागतात. सदावर्ते या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत त्यामुळे ते घरातून बाहेर जाणार की सुरक्षित होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

Maharashtra Live News Update: येत्या ५ तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT