Salman Khan
Bigg Boss SAAM TV

Bigg Boss 18 : बाबा सिद्दीकींच्या निधनानंतर सलमानची लीलावतीमध्ये धाव, बिग बॉसच शूटिंगही केलं रद्द

Salman Khan : बाबा सिद्दीकी यांचे बॉलिवूडमध्येही चांगले संबंध होते. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या निधनाची बातमी ऐकताच सलमान खानने बिग बॉस 18 चे शूटिंग रद्द केलं आहे.
Published on

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. वांद्रे परिसरात ही घटना घडली आहे. वांद्रे येथे खेरवाडी जंक्शनच्या सिग्नलजवळ बाबा सिद्दीकी यांच्या मुलाचे कार्यालय आहे. त्यांच्या मुलाचे नाव झिशान सिद्दीकी असे आहे. याच परिसरात बाबा सिद्दीकी (Baba Siddique ) यांच्यावर गोळया झाडण्यात आल्या.

बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये ही शोककळा पसरली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींचे बाबा सिद्दीकी यांच्यासोबत चांगले नाते होते. बॉलिवूडची मंडळी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावायचे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच बॉलिवूडची अनेक सेलिब्रिटींनी लीलावती रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. बॉलिवूडचा भाईजान (Salman Khan) म्हणजे आपला सलमान खान देखील लीलावती रुग्णालयात गेला. सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांची जुनी मैत्री होती. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या निधनाची बातमी समजताच त्याने बिग बॉस 18 चे (Bigg Boss) शूटिंग कॅन्सल केले आणि तो लीलावती रुग्णालयात गेला.

बाबा सिद्दीकी आणि सलमान खान अनेक वेळा एकत्र दिसायचे. सलमान खान अनेक वेळा अडचणीत सापडला होता तेव्हा तेव्हा बाबा सिद्दीकी यांनी त्याला मदतीचा हात दिला होता. बाबा सिद्दीकी यांनी अनेक माध्यमातून सलमान खान यांची मदत केली आहे.

Salman Khan
Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांनी मिटवला होता सलमान-शाहरुखमधील वाद; त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com