Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांनी मिटवला होता सलमान-शाहरुखमधील वाद; त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

Shah Rukh Khan-Salman Khan Fight : राष्ट्रीय काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये ही शोककळा पसरली आहे.
Shah Rukh Khan-Salman Khan Fight
SAAM TVSAAM TV
Published On

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येमुळे बॉलिवूडमध्ये ही शोककळा पसरली आहे. एकेकाळी बाबा सिद्दीकी यांनी सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्यातील वाद मिटवला होता. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या.

सलमान खान - शाहरुख खान मधील वाद

कतरिना कैफच्या बर्थडे पार्टीत भाईजान आणि किंग खानमध्ये मोठे भांडण झालो होते. हा भांडण 2008 यावर्षी झाले होते. पुढचे 5 वर्षे सलमान खान आणि शाहरुख खान एकमेकांशी बोले नव्हते. यांच्यातील अबोला किंवा दुरावा बाबा सिद्दीकी यांनी मिटवला होता. दोन मित्रांना त्यांनी पुन्हा एकदा एकत्र आणले होते.

बाबा सिद्दीकी यांनी 2013 मध्ये घरी इफ्तार पार्टी आयोजित केली होती आणि सलमान खान आणि शाहरुख खान यांनाही आमंत्रण दिले होते. त्यामुळे दोघांनीही या इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. तेथे त्यांच्यात पुन्हा मैत्री झाली. पाच वर्षांची नाराजी त्या पार्टीमध्ये बोलून त्यांनी मिटवली आणि एकमेकांकडे मैत्रीचा हात पुढे केला. एकमेकांना मिठी मारून त्यांनी जुने सर्व विसरून नव्या नात्याला सुरुवात केली होती. या बाबा सिद्दीकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमुळे दोघांमधील वाद मिटून मैत्री घट्ट झाली. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थिती लावतात.

आज सलमान खान आणि शाहरुख खान बॉलिवूडमध्ये दमदार काम करताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्यांनी अनेक प्रोजेक्ट देखील एकत्र केले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या निधनाची बातमी समजताच दोघांनाही दुःख अनावर झाले आहेत.

Shah Rukh Khan-Salman Khan Fight
Riteish-Genelia : जेव्हा रितेशनं जिनिलीयासोबत केलं होतं ब्रेकअप, त्यावेळी नेमकं काय झालं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com