Rashmika Mandanna and Vijay Devarakonda: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने आगामी चित्रपट 'सिकंदर'च्या ट्रेलर लाँच दरम्यान एका विचित्र टिप्पणीसह रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या नात्याबद्दलच्या अटकळांना नवीन वळण दिले आहे. रविवारी झालेल्या ट्रेलर लाँच सोहळ्यात सलमानने त्याच्या आणि रश्मिका मंदान्नामधील वयाच्या अंतराभोवती सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. तथापि, त्याच्या उत्तरादरम्यान, त्याने अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रकाश टाकला, त्यावरून चाहत्यांचा असा अंदाज आहे की रश्मिका लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या कपलबद्दल सुरू असलेल्या अफवांना आणखीन चालना देत सलमान म्हणाला, आता जेव्हा ती लग्न करेल, तिला मुले होतील आणि तिची मुले देखील जेव्हा मोठे स्टार होतील, तेव्हा ते देखील माझ्यासोबत काम करतील, बरोबर? त्यांना त्यावेळी त्यांच्या आईची परवानगी मिळेलच, बरोबर?"
सलमान खान पुढे म्हणाला की माझ्या आणि नायिकेत ३१ वर्षांचा फरक आहे. जर नायिकेला काही अडचण नसेल किंवा नायिकेच्या वडिलांना काही अडचण नसेल, तर तुम्हाला का अडचण आहे?"
सलमान खानच्या या टिप्पणीमुळे रश्मिका आणि विजय यांच्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधांबद्दलच्या अटकळांना वेग आला आहे. हिट चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केलेले हे दोन्ही अभिनेते बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जाते. त्यांच्या सोशल मीडियावर अनेक फोटो एक सारखे दिसून आल्यामुळे या अफवांना सुरुवात झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.