King Kohli IPL Memories: आयपीएलच्या उद्घाटनात अनुष्काचा डान्स पाहून विराट झाला घायाळ; व्हिडीओ पुन्हा व्हायरल

King Kohli IPL Memories: आज कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे २०२५ च्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामाची सुरुवात होत आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर २०१५ च्या आयपीएल उद्घाटन समारंभाच्या आठवणी व्हायरल होत आहेत.
King Kohli- anushka sharma IPL Memories
King Kohli- anushka sharma IPL MemoriesSaam Tv
Published On

२०२५ च्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामाची सुरुवात आज कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे होत आहे. चाहते भव्य उद्घाटन समारंभाची आतुरतेने वाट पाहत आहेत, यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी, गायिका श्रेया घोषाल आणि पंजाबी कलाकार करण औजला यांच्या सादरीकरणाचा समावेश असेल. उत्सवानंतर, गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध खेळतील.

हा आरसीबी सामना असल्याने, सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. 'विरुष्का' (विराट आणि अनुष्का शर्मा) चे चाहते देखील अनुष्काला तिच्या पतीसाठी जल्लोष करताना पाहण्याची आशा करत आहेत. त्यामुळे सोशल मिडीयावर २०१५ च्या आयपीएल उद्घाटन समारंभाच्या आठवणी व्हायरल होत आहेत. हा क्षण विराट आणि अनुष्काच्या नात्यासाठी खूप खास होता.

King Kohli- anushka sharma IPL Memories
Sikandar Trailer: सलमान खानच्या 'सिकंदर'चा ट्रेलर होणार या दिवशी प्रदर्शित; रिलीजच्या आठवडाआधी चाहत्यांना मोठं सरप्राईज

२०१५ मध्ये, विराट आणि अनुष्का डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्या वर्षीच्या आयपीएल उद्घाटन समारंभात चाहत्यांना एक क्षण ठिपला. स्टायलिश ब्लॅक अँड व्हाईट पोशाखात अनुष्काने २०११ मध्ये आलेल्या 'लेडीज व्हर्सेस रिकी बहल' चित्रपटातील 'ठग ले' गाण्यावर डान्स सादर केला. त्यावेळी विराट फार प्रेमाने तिचा डान्स पाहत होता. हा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या अफवांना आणखी बळकटी मिळाली.

King Kohli- anushka sharma IPL Memories
Ekta Kapoor: स्वतःचे पैसे गुंतवा... एकता कपूरने अनुराग कश्यप आणि हंसल मेहतांवर टीका केली! प्रेक्षकांनाही फटकारले, जाणून घ्या प्रकरण

विराट-अनुष्काची प्रेमकहाणी

अनुष्का आणि विराटची पहिली भेट २०१३ मध्ये एका लोकप्रिय शॅम्पू ब्रँडसाठी टेलिव्हिजन जाहिरातीचे चित्रीकरण करताना झाली होती. त्यांच्यातील केमिस्ट्री तेव्हापासूनच उघड होऊ लागली. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये इटलीतील टस्कनी येथे एका खाजगी समारंभात या जोडप्याने लग्न केले. जानेवारी २०२१ मध्ये, अनुष्का आणि विराटने यांना पहिली मुलागी (वामिका) झाली. त्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये, त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे, अकायचे स्वागत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com