Salim Khan Birthday SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salim Khan Birthday: तब्बल ११ वर्षांची मैत्री क्षणार्धात तुटली, 'त्या' संध्याकाळी नेमकं काय घडलं?

Salim Khan And Javed Akhtar Friendship: ७०चं दशक गाजवणारी जोडी सलीम खान आणि जावेद अख्तर अचानक वेगळे झाले. त्यांची मैत्री तुटली. यामागे नेमकं कारण काय, जाणून घ्या.

Shreya Maskar

मनोरंजन सृष्टीत अनेक नाती जोडली जातात. काही आयुष्यभराची साथ देतात तर काही अध्यावर्ती तुटतात. यातून अनेक वेळा मैत्री , प्रेमाची आणि जिव्हाळ्याची नाती बनतात. अशीच एक मैत्रीचे गोड नाते सलीम खान आणि जावेद अख्तर यांचे होते. या जोडीने ७०चे दशक गाजवल होत. सलीम खान आणि जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी तब्बल ११ वर्षे एकत्र काम केलं.

आज ( 24 नोव्हेंबर) ला हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ लेखक सलीम खान (Salim Khan) यांचा 89वा वाढदिवस आहे. यांनी अनेक दमदार चित्रपटांचे लेखन केले आहे. सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी मिळून अनेक हिट चित्रपट केले आहेत. यात शोले, डॉनसह अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या नात्यात अचानक दुरावा आला. एका संध्याकाळने यांची मैत्री तोडली. सलीम खान यांनी एका मुलाखती याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, मी संध्याकाळी काम करत बसलो होतो. तेव्हा जावेद तिथे आला आणि म्हणाला की, " यापुढे आपण वेगळे होऊन काम करूया. हे ऐकून मला धक्का बसला आणि कळत नव्हते हा असा का बोलत आहे. जावेद अनेक दिवसांपासून याचा विचार करत होता." या संध्याकाळनंतर ही गोड जोडी कायमची वेगळी झाली.

पुढे सलीम खान म्हणाले की, " प्रत्येक पदार्थाच्या डब्यावर एक्सापायरी डेट असते. तशीच कदाचित आमच्याही नात्याला असावी." जावेद अख्तर यांनी देखील त्यांच्या सलीम खान यांच्या सोबतच्या मैत्रीवर आपले मत मांडले होते. ते म्हणाले होते की, "सलीम आणि मी तब्बल ११ वर्ष एकत्र काम केले. त्यासाठी सुसंवाद आणि एकमेकांच्या मतांचा आदर खूप महत्त्वाचा होता. आम्हा दोघांना एकमेकांच्या गोष्टी पटकन कळायच्या मात्र कालांतराने आमची मानसिक विचारांच्या बाबतीत वेगवेगळी मते होऊ लागली आणि आमच्यात संवाद राहिला नाही. आमच्यात कोणताही वाद झाला नाही पण आम्ही आता वेगळे झालो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT