Saiyaara Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Saiyaara Box Office Collection Day 9 :'सैयारा'ने वीकेंडला धुमाकूळ घातला आहे. अहान पांडेच्या चित्रपटाने आता २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ९व्या दिवशी किती कमावले जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'सैयारा' चित्रपट 18 जुलैला रिलीज झाला आहे.

'सैयारा' चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.

'सैयारा'चे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले आहे.

सुपरहिट चित्रपट 'सैयारा' (Saiyaara) 18 जुलैला रिलीज झाला आहे. 9 दिवसांत चित्रपटाने थिएटर गाजवले आहे. सर्वत्र 'सैयारा'च्या गाण्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. 'सैयारा' जोडी अनीत पड्डा (Aneet Padda) आणि अहान पांडेच्या (Ahaan Panday) अभिनयाने तर चाहत्यांना वेड लावले आहे. त्यांच्या चित्रपटातील केमिस्ट्रीने प्रेक्षकांना सिनेमासोबत बांधून ठेवले आहे. 'सैयारा'चे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले आहे. चित्रपटाने 9 दिवसांत किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

200 कोटींचा टप्पा पार

'सैयारा' ही सुंदर प्रेम कथा आहे. चित्रपटाने 9 दिवसांत 217 कोटी रुपये कमाई करून 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता चित्रपटाची 300 कोटींच्या दिशेने यशस्वी घोडदौड पाहायला मिळत आहे. सर्वत्र फक्त 'सैयारा'ची हवा पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार,'सैयारा'ने पहिल्या आठवड्यात 172.75 कोटींची कमाई केली आहे. आता चित्रपट दुसऱ्या रविवारी कसा धुमाकूळ घालतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'सैयारा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 9

  • पहिला दिवस - 21 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 26 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 37.75 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 25 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 21 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 15.13 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 18 कोटी रुपये

  • नववा दिवस - 26.5 कोटी रुपये

  • एकूण - 217 कोटी रुपये

'सैयारा'ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

मीडिया रिपोर्टनुसार, 'सैयारा' 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. 'सैयारा'ने 'हाउसफुल 5', 'रेड 2', 'सितारे जमीन पर' या चित्रपटांना मागे टाकले आहे. आता 'सैयारा'च्या निशाण्यावर विकी कौशलचा 'छावा' चित्रपट आहे. 'सैयारा' 9 दिवसांत एकूण 217 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

टॉप 5 चित्रपट

  • छावा - 601 कोटी रुपये

  • सैयारा - 217 कोटी रुपये

  • हाउसफुल 5 - 183 कोटी रुपये

  • रेड 2 - 173 कोटी रुपये

  • सितारे जमीन पर - 163 कोटी रुपये

'सैयारा' कधी रिलीज झाला?

18 जुलै

'सैयारा'ची कमाई किती?

200 कोटींचा टप्पा पार

'सैयारा'चं दिग्दर्शक कोण?

मोहित सूरी

'सैयारा'ची स्टारकास्ट कोण?

अनीत पड्डा-अहान पांडे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकून, जालना हादरलं

Bihar Election Result: कधीपासून सुरू होणार EVM मतमोजणी; कशी असणार मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था?

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल अपघातात ८ जणांना मृत्यू

Todays Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ मिळेल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT