Shreya Maskar
मेथीची डाळ बनवण्यासाठी चणा डाळ, मेथीची पाने, कांदा, टोमॅटो, लाल मिरची, हळद, धने पावडर, तूप, जिरे, हिंग, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
मेथीची डाळ बनवण्यासाठी चणा डाळ नीट धुवून कुकरला शिजवून घ्या.
दुसरीकडे मेथीची पाने तोडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
कुकरमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, धनेपूड आणि हळद घालून मध्यम आचेवर शिजवून घ्या.
यात उकडलेली डाळ, तेल आणि पाणी टाकून एक शिट्टी करून घ्या.
तडका बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून जिरे, लाल मिरची, जिरे टाकून मिक्स करा.
तयार तडका चणा डाळ आणि मेथीच्या मिश्रणावर टाका. चमचमीत मेथीची डाळचा गरमागरम भातासोबत आस्वाद घ्या.