Shreya Maskar
पावसाळ्यात जेवताना काही झणझणीत खावेसे वाटत असेल तर मालवण स्पेशल तिखट चटणी बनवा.
मालवण स्पेशल तिखट चटणी बनवण्यासाठी सुक्या लाल मिरच्या, सुकं खोबरं, लसूण, आलं, मोहरी, मेथी दाणे, हिंग, हळद, जिरे, गरम मसाला, मीठ, तेल आणि साखर इत्यादी साहित्य लागते.
मालवण स्पेशल तिखट चटणी बनवण्यासाठी सुक्या लाल मिरच्या गरम पाण्यात भिजत ठेवा.
दुसरीकडे पॅनमध्ये तेल टाकून सुकं खोबरं भाजून घ्या.
मिक्सरला गरम पाण्यात भिजवलेल्या लाल मिरच्या, भाजलेले खोबरे, लसूण, आलं, मीठ आणि इतर मसाले टाकून बारीक वाटून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, मेथी दाणे, हिंग आणि जिरे टाकून फोडणी तयार करा.
यात गरम मसाला आणि साखर, मिरच्यांचे वाटलेले मिश्रण टाकून शिजवून घ्या.
गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत मालवण स्पेशल तिखट चटणीचा आस्वाद घ्या.