Saiyaara Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Saiyaara Box Office Collection : अहान पांडेच्या 'सैयारा'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, लवकरच गाठणार २०० कोटींचा टप्पा

Saiyaara Box Office Collection Day 8 : बॉलिवूड अभिनेता अहान पांडेच्या 'सैयारा'ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत जात आहे. चित्रपट लवकरच 200 कोटींचा टप्पा पार करणार आहे.

Shreya Maskar

'सैयारा' चित्रपट 18 जुलैला रिलीज झाला आहे.

'सैयारा' चित्रपट लवकरच 200 कोटींचा टप्पा पार करणार आहे.

'सैयारा' ही प्रेम कथा आहे.

'सैयारा' (Saiyaara) या प्रेम कथेने अवघ्या जगाला वेड लावले आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. 'सैयारा' चित्रपटातील नव्या जोडीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटातील गाण्यांची क्रेझ भन्नाट पाहायला मिळत आहे. 'सैयारा' चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले आहे. या चित्रपटात अनीत पड्डा (Aneet Padda) आणि अहान पांडे (Ahaan Panday) मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

'सैयारा' चित्रपट आता लवकरच 200 कोटींचा टप्पा पार करणार आहे. रिलीजच्या दुसऱ्या वीकेंडला चित्रपट किती कोटींची कमाई करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. 'सैयारा' चित्रपट 18 जुलैला रिलीज झाला आहे. चित्रपटाने आठ दिवसांत किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

'सैयारा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8

  • पहिला दिवस - 21 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 26 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 37.75 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 25 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 21 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 15.13 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 17.50 कोटी रुपये

  • एकूण - 190.25 कोटी रुपये

ओटीटी रिलीज

मीडिया रिपोर्टनुसार, 'सैयारा' चित्रपटाचे बजेट 40 ते 60 कोटींच्या दरम्यान आहे. चित्रपटाने आपले बजेट देखील वसूल केले आहे. 'सैयारा' ही एक प्रेम कथा असून संघर्ष करणाऱ्या संगीतकाराची गोष्टी देखील यात सांगितली गेली आहे. 'सैयारा' चित्रपट थिएटर गाजवल्यानंतर ओटीटीवर पाहता येणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'सैयारा' चित्रपटाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहे. 2 ते 3 महिन्यांनंतर ही रोमँटिक लव्हस्टोरी तुम्हाला ओटीटीवर पाहायला मिळेल. मात्र अद्याप 'सैयारा'च्या ओटीटी रिलीजची अधिकृत डेट जाहीर करण्यात आली नाही आहे.

'सैयारा' कधी रिलीज झाला?

18 जुलै

'सैयारा' बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

190 कोटी रुपयांचा टप्पा पार

'सैयारा' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?

नेटफ्लिक्स

'सैयारा'चे दिग्दर्शक कोण?

मोहित सूरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Chat Masala Recipe: घरच्या घरी बनवा 'चटपटीत' चाट मसाला, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी

नितीश राणाची अंपायरसोबत तू-तू, मैं-मैं; संतापलेल्या स्टब्सनं तावातावात फेकलं हेल्मेट, सामन्यादरम्यान चेपॉकमध्ये काय घडलं?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र येणं टाळले

Mumbai Local: पश्चिम रेल्वे खोळंबली! वसईजवळ ओव्हरहेड वायर तुटली; प्रवासी रूळावरून चालत निघाले, पाहा VIDEO

Mumbai : बड्या मंत्र्यांसोबत फोटो, स्मार्ट व्हिलेजमध्ये गुंतवणुकीचे आमिष; डॉक्टरने व्यवसायिकाला 1.13 कोटींना गंडा घातला

SCROLL FOR NEXT