Saiyaara Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Saiyaara Box Office Collection: 'सैयारा'ची आठवड्याभरात छप्परफाड कमाई; सातव्या दिवशी केला इतक्या कोटींचा गल्ला

Saiyaara Box Office Collection Day 7: यशराज बॅनरखाली बनलेल्या 'सैयारा'मध्ये अहान पांडे आणि अनित पड्डा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच आपली जादू दाखवायला सुरुवात केली आहे.

Shruti Vilas Kadam

Saiyaara Box Office Collection Day 7: मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाचं गाजत आहे. मोहित सुरीच्या या रोमँटिक चित्रपटात नवीन अभिनेता अहान पांडेला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असून, अहान पांडेचा पहिला चित्रपट 'सैयारा' १८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, 'सैयारा'च्या सातव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहेत.

'सैयारा'ने आतापर्यंत किती कमाई केली आहे

यशराज बॅनरखाली बनलेल्या 'सैयारा'मध्ये अहान पांडे आणि अनित पड्डा मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाने पहिल्या दिवशीच आपली जादू दाखवली आहे. 'सैयारा' चित्रपटातील अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या अभिनयाचे लोक कौतुक करत आहेत. 'सैयारा' चित्रपटाला समीक्षकांकडून तसेच स्टार्सकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'सैयारा' चित्रपटाने पहिल्या दिवशी २१ कोटी रुपयांची मोठी कमाई केली. तर, सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, 'सैयारा'ने सातव्या दिवशी १५.१३ कोटी रुपये कलेक्शन केले आहेत.

'सैयारा' चित्रपटाचं कलेक्शन

दिवस १- २१.५ कोटी

दिवस २-२६ कोटी

दिवस ३-३५.७५ कोटी

दिवस ४-२४ कोटी

दिवस ५-२५ कोटी

दिवस ६-२१.५ कोटी

दिवस ७- १५.१३ कोटी

एकूण कलेक्शन- १६८.८८ कोटी

‘सैयारा’ दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस २०० कोटींचा टप्पा गाठेल

पहिल्या आठवड्याच्या अखेरीस, सैयारा सहजपणे १५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. २५ जुलै २०२५ रोजी कोणताही मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित होत नाही, त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT