Saif Ali Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan: सैफ अली खानची आता प्रकृती कशी? घरी कधी परतणार? वाचा हेल्थ अपडेट

Saif Ali Khan Health Update : सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफला आयसीयूमधील स्पेशल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. आता त्याची हेल्थ अपडेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) गुरुवारी चाकूने हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तबंबाळ सैफला इब्राहिमने रिक्षातून लिलावती रुग्णालयात घेऊन गेला. गुरुवारी मध्यरात्री सैफ अली खानच्या घरी चोर घुसला होता. सैफ अली खानवर हल्ला मध्यरात्री अडीच ते तीन वाजल्याच्या सुमारास झाला.

सैफ अली खान हेल्थ अपडेट

डॉक्टरांनी घेतलेल्या पत्रकार परिषद त्यांनी सैफचा हेल्थ अपडेट दिला. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सैफची प्रकृती आता स्थिर आहे. सैफ अली खानला शस्त्रक्रिया झाल्यानंतर आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. मात्र आता सैफला आयसीयूमध्ये स्पेशल रुममध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.

सैफने चालण्याचा प्रयत्न देखील केला आहे. सैफ अली खानला आता विश्रांतीची गरज आहे. पाठीवर खोल जखम झाली असल्यामुळे बेडरेस्ट सांगण्यात आला आहे. सैफ अली खानच्या डॉक्टरांनी सैफला सोमवारपर्यंत डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे. सैफ अली खान धोक्याबाहेर आहे. येत्या दोन-तीन दिवसांत त्यांना डिस्चार्ज दिला जाईल.

सैफच्या शस्त्रक्रियेत दरम्यान त्याच्या मणक्यात अडकलेल्या चाकूचा एक भाग काढण्यात आला. त्याला काल म्हणजे शुक्रवारी आयसीयूमधील स्पेशल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेत सैफला रुग्णालयात आणले होते. त्याच्याशी झालेल्या झटापटीत चोराने सैफवर चाकूने हल्ला केला. यात चोराने ६ वार केले. यातील दोन वार गंभीर होते. सैफवर त्याच्या वांद्रे येथील घरामध्ये हल्ला करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Courtroom Drama: इमरान हाश्मीचा 'हक' पाहायला जायचा प्लॅन करताय? त्याआधी ओटीटीवर पाहा 'हे' कोर्टरूम ड्रामा चित्रपट

Maharashtra Live News Update: मरीन लाईन्स परिसरातील इमारतीला आग

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी दोघे ताब्यात, हत्येची सुपारी देणारा बडा नेता कोण?

Ind vs Aus: भारताच्या धारदार गोलंदाजीसमोर बॅटिंग ढासळली; सिरीजमध्ये टीम इंडिया आघाडीवर

Bihar Election: उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला घेराव; वाहनांवर दगड, शेणफेक, बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न, मतदानावेळी तुफान राडा

SCROLL FOR NEXT