Sai Tamhankar New House Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar: काही गोष्टी सोडून देता येत नाहीत... सई ताम्हणकर असं का म्हणाली? VIDEO तून मिळेल उत्तर

Sai Tamhankar New House : सईने मुंबईत तिचं स्वतःचं घर खरेदी केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sai Tamhankar Share Video Of Her House

सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सईने मराठीसह हिंदीतही आपला ठसा उमटवला आहे. सई खूप वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करतेय. खूप मेहनतीनंतर आता सईने मुंबईत तिचं स्वतःचं घर खरेदी केलं आहे.

सई ताम्हणकरचा सांगली ते मुंबई हा प्रवास सर्वांनाच माहित आहे. सईने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. अभिनेत्रीने आता मुंबईत तिचं स्वतः चं घर घेतलं आहे. आपण नवीन घरात गेलो तरीही जुन्या आठवणी या सोबतच असतात. असंच काहीसं सईच्याबाबतीत झालंय. सई ताम्हणकरने तिच्या जुन्या घराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सई ताम्हणकरने नुकतंच मुंबईत तिचं पहिलं घर घेतलं आहे. यावेळी जुन्या घरातून शिफ्ट होतानाचा व्हिडिओ सईने शेअर केला आहे.व्हिडिओत सई तिच्या वस्तूंची पॅकिंग करताना दिसत आहे. सई भावूक झालेली दिसत आहे.

"मला खरंच अजूनही या घरातून जावंसं वाटत नाहीये. मला माहितीये की, ते घरं खूप छान आणि मोठं आहे. परंतु अशा काही गोष्टी असतात ज्या कधीच सुटत नाही. हे घर त्यातीलच एक आहे. या घराने खूप काही पाहिलंय. खूप काही शिकवलंय. या घराने मला खूप काही दिलंय". असं म्हणत सई भावूक झाल्याची दिसत आहे.

सईने तिच्या जुन्या घराविषयी भावना शेअर केल्या आहेत. 'द इलेव्हेन्थ प्लेस(अकरावी जागा). पुन्हा एकदा घाबरत आणि उत्साहात नवीन घरात पाऊल ठेवले. माझं एक स्वपन पूर्ण झालं आहे. माझं मुंबईतील पहिलं घरं.

माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा पल्ला गाठला आहे. एक जागा ज्याला घर म्हणू शकते. जिथे नवीन आठवणी विणल्या जातील. या आनंदाच्या काळात एक कडू आठवण, एके काळी जे माझे घर होते. त्याला निरोप देताना, माझ्या घरच्या भितींना, माझा कम्फर्ट झोन सोडत, मी ही जागा सोडत आहे. मी प्रत्येक गोष्ट पॅक करताना घरातील आठवणी जाग्या होतात. हसण्याच्या, बोलण्याच्या, इथे घालवलेल्या प्रत्येक वेळेची आठवण येते. परंतु यापुढे मी आयुष्यातील नवीन अध्यायाला सुरवात करत असताना, माझं मनं भरु येत आहे.

या घराच्या आठवणी, शिकवणी सोबत घेऊन नवीन घरात, नवीन स्वप्नांसोबत पाऊल ठेवत आहे. मी या घराला कृतज्ञेने निरोप देत आहे. जुन्याकडून नवीन प्रवासासाठी, मी माझ्या नवीन घरात पाऊल ठेवत आहे'. असं कॅप्शन सईने दिलं आहे.

सईने जुन्या घरातील आठवणींना उजाळा देत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सईच्या नवीन घरासाठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peanut Chutney Recipe : नाश्त्याला बनवा शेंगदाण्याची झणझणीत ओली चटणी; डोसा,वडा,इडलीची चव वाढवेल

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

Mozambique Accident : मोठी दुर्घटना, समुद्रात बोट उलटली, ३ भारतीयांचा मृत्यू, ५ बेपत्ता

Central Railway Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडताना वेळपत्रक वाचा

OPPO Find X9 Series: येणार येणार तुमचा फोटो भारीच येणार! दमदार कॅमेरावाला OPPO Find X9 Series च्या लॉन्चची तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT