दाक्षिणात्य अभिनेत्री अपर्णा नायर हिचा ३१ व्या वर्षी मृत्यू झाला. तिच्या घरातच मृतावस्थेत आढळून आली. ३१ ऑगस्टला संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मृत्यूपूर्वी अपर्णा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. तिनं काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले होते.
तिरुवनंतपुरम येथील अपार्टमेंटमध्ये अपर्णा नायरचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ३१ ऑगस्टला संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना समोर आली. त्यावेळी तिची आई आणि बहीण घरात होती.
करमना पोलिसांनी अपर्णा नायरच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी कुटुंबीय आणि नातेवाइकांचा जबाब नोंदवला आहे. मृत्यूच्या काही तास आधीच सोशल मीडिया अकाउंटवरून तिने काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.
शेवटच्या पोस्टमध्ये दिला होता संदेश
अपर्णा नायर अवघ्या ३१ वर्षांची होती. घरात तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं तपासून डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिच्या पश्चात पती संजीत आणि मुली कृतिका आणि तराया आहेत.
मृत्यूच्या काही तास आधीच अपर्णानं सोशल मीडियावरून आपल्या मुलीचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला होता. एक व्हिडिओ कोलाजही शेअर केला होता. त्या व्हिडिओला तिनं स्वतःचा आवाज दिला होता. महिलांना आयुष्यात किती अडचणींचा सामना करावा लागतो हे तिनं व्हिडिओतून सांगितलं होतं. (Latest Entertainment News)
सर्वांनाच धक्का
मळ्यालम अभिनेत्री (Actress) अपर्णा नायरच्या मृत्यूच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. अपर्णा नायरने चंदनमाझा, आत्मसखी, मैथिली विंदुम वरुम आणि देवस्पर्शम यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. काही चित्रपटांमध्येही तिच्या खास भूमिका होत्या. निवेद्यममध्येही तिनं अभिनय केला होता. याशिवाय मल्लू सिंह, थट्टाथिन मरायथु, जोशीज रन बेबी रन यांसारख्या चित्रपटांतही तिने भूमिका निभावल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.