Famous Actress Wedding saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

Famous Marathi Actress Wedding Video : टिव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.

Shreya Maskar

मराठी मनोरंजन सृष्टीतून आनंदाची बातमी समोर आली आहे.

'सहकुटुंब सहपरिवार' फेम प्रसिद्ध अभिनेत्री नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे.

अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठी मनोरंजन सृष्टीतून आनंदाची बातमी समोर आली आहे. बिग बॉसचा विजेता सूरज चव्हाण देखील लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. चाहते त्यांच्या लग्नासाठी खूपच उत्सुक आहेत. अशात आता प्रसिद्ध अभिनेत्री नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री कोमल कुंभारने लग्न केले आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोमलने 25 नोव्हेंबरला लग्नगाठ बांधली.

कोमलचा नवरा कोण?

कोमल कुंभारने गोकुळ दशवंतशी लग्नगाठ बांधली आहे. कोमल आणि गोकुळ अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. कोमलच्या वाढदिवसाला गोकुळने तिला प्रपोज केले. गोकुळ दशवंत देखील एक उत्तम अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक आहे. त्याचे मराठी इंडस्ट्रीत मोठी ओळख आहे. दोघे एकत्र खूपच आनंदी आणि सुंदर दिसत आहेत.

लग्नातील लूक

कोमल आणि गोकुळने लग्नात पारंपरिक लूक केला होता. कोमलने पोपटी रंगाची सुंदर साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा, नाकात नथ, मॅचिंद ज्वेलरी घालून तिने लूक पूर्ण केला होता. तर गोकुळने आयव्हरी रंगाची शेरवानी परिधान केली होती. त्याला मॅचिंग पोपटी रंगाचा फेटा आणि शेलासोबत होता. दोघेही लग्नात सुंदर दिसत होते. या लग्न सोहळ्याला घरातील कुटुंब आणि मित्रमंडळींनी उपस्थिती लावली.

वर्कफ्रंट

आजवर कोमल कुंभारने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. यात 'सहकुटुंब सहपरिवार', 'अबोली' यांसारख्या मालिकांचा समावेश आहे. 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील तिचे अंजली (अंजी) हे पात्र खूपच गाजले. सध्या कोमल आणि गोकुळवर चाहते, कलाकार मंडळी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

Guru Gochar 2025: पुढच्या वर्षी या राशींवर गुरुची राहणार कृपा; अडकलेला पैसा आणि नवी नोकरीही मिळू शकते

SCROLL FOR NEXT