Shreya Maskar
माव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी मावा, मैदा, मिल्क पावडर, बेकिंग सोडा, तूप, साखर, वेलची पूड, केसर आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
माव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वप्रथम मावा मऊ आणि गुळगुळीत होईपर्यंत १० मिनिटे मळून घ्या.
यात मैदा, मिल्क पावडर आणि बेकिंग पावडर घालून चांगले मिक्स करा. तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचे छोटे काप देखील टाकू शकता.
तयार मिश्रणात थोडे कोमट दूध घालून पीठ मऊ होईपर्यंत मळा. कणिक मळून झाल्यावर १०-१५ मिनिटे बाजूला करून ठेवा.
एका बाऊलमध्ये साखर आणि पाणी एकत्र करून गरम करा. गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या.
साखर विरघळल्यावर पाक उकळून द्या. यात वेलची पूड आणि केसर टाका. ज्यामुळे गुलाबजामची चव आणखी वाढेल.
मैद्याच्या मिश्रणाचे छोटे गोळे करून तेलात खरपूस गोल्डन फ्राय करा. गुलाबजाम जळणार नाही, याची काळजी घ्या.
तळलेले गुलाबजाम पाकात ३-४ तास पाकात भिजवत ठेवा. फ्रिजमध्ये माव्याचे गुलाबजाम थंड करायला ठेवा आणि नंतर त्याचा आस्वाद घ्या.