Shreya Maskar
फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी बटाटा, व्हिनेगर, मीठ, पाणी, तेल, कॉर्न फ्लावर इत्यादी साहित्य लागते.
फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाट्याची सालं सोलून व्यवस्थित धुवा. बटाटा तुम्ही थोडा कच्चा निवडा.
बटाट्याचे लांब-लांब जाडसर काप करून घ्या. काप पातळ करू नका आणि जास्त जाडही ठेऊ नका. मध्यम आकाराचे बटाटे कापा.
एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात तेल, व्हिनेगर घालून बटाट्याचे तुकडे उकळून घ्या.
उकडलेले बटाट्यांमधील पाणी गाळून घ्या आणि बटाटे कोरडे करायला ठेवा. बटाटे सुकवण्यासाठी ते सुती कपड्यावर पसरवा.
एका बाऊलमध्ये फ्राइज, कॉर्न फ्लावर घालून मिक्स करा. फ्राइजला सर्व बाजूंनी कॉर्न फ्लावर लागेल याची काळजी घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बटाट्याचे फ्राइज तळून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवा. म्हणजे फ्रेंच फ्राइज जळणार नाहीत.
दुसऱ्या बाऊलमध्ये तळलेले फ्रेंच फ्राइज, मीठ टाकून सर्व मिक्स करा. तुम्हाला फ्राइजची चव वाढवायची असेल तर यात पेरी पेरी मसाला तुम्ही टाकू शकता.