Shreya Maskar
हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला गावाकडे बनवतात तशी झणझणीत भरली मिरची हा पदार्थ करा.
भरली मिरची बनवण्यासाठी बेसन, हळद, लाल तिखट, बडीशेप, गरम मसाला, धणे पावडर, मीठ, कोथिंबीर, तेल, लिंबाचा रस, हिरव्या मिरच्या, जरे इत्यादी साहित्य लागते.
भरली मिरची बनवण्यासाठी सर्वप्रथम हिरव्या मोठ्या मिरच्यांना मध्ये ऊभी चीर देऊन कापू घ्याव्यात. जेणेकरून त्यात सारण भरता येईल.
हिरव्या मिरच्यांचा तिखटपणा कमी करण्यासाठी त्यातील बिय काढून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, हिंग आणि बेसन घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावे.
भाजलेल्या बेसनमध्ये, हळद, लाल तिखट पावडर, बडीशेप पावडर, गरम मसाला, धणे पावडर, मीठ, कोथिंबीर, तेल, लिंबाचा रस घालून मिश्रण बनवा.
तयार मिश्रण मिरचीत भरा आणि पॅनमध्ये तेल गरम करून गोल्डन फ्राय करा. मिरची जास्त शिजणार नाही याची काळजी घ्या.
गरमागरम वरण भातासोबत भरलेली मिरचीचा आस्वाद घ्या. गावाकडे ही मिरची भाकरीसोबत खाल्ली जाते.