
नागपूर बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार अटकेत.
घोटाळ्याचा अंदाजित आकडा १०० कोटींहून अधिक.
आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी.
६३२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैधता तपासली जाणार.
नागपूरमधील बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नागपूरच्या विद्यमान प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना अखेर अटक करण्यात आली. या दोघांना न्यायालयात हजर करून पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात १०० कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक बाबी समोर येण्याची शक्यता असल्याने पोलिस सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल करणार आहेत. राज्यस्तरीय एसआयटी गठित झाल्यावर ही पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी प्रकरणाचा खुलासा होताच अंतरिम जामीन घेतला होता. पण अखेर आरोपींना अटक करत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, बोगस शिक्षक आयडी घोटाळा प्रकरणात अडकलेल्या ६३२ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वन-टू-वन सुनावणीची प्रक्रिया लवकरच होणार सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या वैद्यते संदर्भात शिक्षण उपसंचालक अंतिम निर्णय घेणार आहेत. शिक्षण आयुक्तांनी २९ जुलैला उपसंचालकांना सुनावणीचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करून नियुक्ती बोगस की वैद्य हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या बोगस कागदपत्रामुळे नियुक्ती घेणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.