Nagpur News : धक्कादायक! बिअर बारमध्ये सरकारी फाईल दाखवल्या; नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, VIDEO

nagpur breaking news : नागपुरात काही दिवसांपूर्वी बिअर बारमध्ये सरकारी फाईल दाखवल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
nagpur breaking news
nagpur newsSaam tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : राज्याची उपराजधानी बिअरबारमध्ये चालणाऱ्या सरकारी कारभारामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी बिअरबारमध्ये बसून सरकारी अधिकाऱ्याने फाईल दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या बारमध्ये दारुचे घोट रिचवत सरकारी फाईलवर सह्या केल्या जात असल्याचे उघड झाले. याच प्रकाराचा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

नागपुरात रविवारी बारमध्ये बसून महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फाईल क्लिअर करण्याचं काम सुरु असल्याचं धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. या सर्व प्रकरणाची तातडीने चौकशी सुरु झाली. या प्रकरानंतर राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर तीन दिवसांत कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

nagpur breaking news
Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

नागपुरातील बिअरबारमधील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये टेबलावर तीन व्यक्ती बसलेले दिसत आहेत. या टेबलावर महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या फाईल्स दिसत आहेत. बारमध्ये टेबलावर बसलेले व्यक्ती सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित आहे का? असा सवाल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपस्थित करण्यात आला. महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फाईली पाहताना ते काय काम करत होते, याविषयी चर्चा सुरु झाली आहे. तिघे जण गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे.

nagpur breaking news
Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

दरम्यान, या सीसीटीव्ही व्हिडिओमधील व्यक्ती हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत किंवा गडचिरोलीची आहेत, याविषयी साम टीव्ही कुठलाही दावा करत नाही. तसेच पोलिस देखील या संदर्भात कुठल्याही प्रतिक्रिया देण्यासाठी समोर येत नाही. त्यामुळे पोलिसांनी चौकशी सुरू केली अशी माहिती मात्र सूत्रांकडून मिळते आहे.

nagpur breaking news
CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com