Ashi Hi Banwa Banwi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ashi Hi Banwa Banwi : "धनंजय माने इथेच राहतात का?" डायलॉग कोणी लिहिला? सचिन पिळगांवकर यांनी सांगितला भन्नाट किस्सा

Sachin Pilgaonkar Talk On Ashi Hi Banwa Banwi : 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील डायलॉग खूप प्रसिद्ध आहेत. हे डायलॉग कोणी लिहिले याचा खुलासा मराठी दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी केला आहे.

Shreya Maskar

मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक चित्रपट झाले पण काही चित्रपट कायम आपल्या मनात घर करून राहतात. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे 'अशी ही बनवा बनवी' (Ashi Hi Banwa Banwi) . 'अशी ही बनवा बनवी' हा चित्रपट आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतो. या चित्रपटातील डायलॉगने तर सिनेमाला चारचाँद लावले आहेत.

'अशी ही बनवा बनवी' चित्रपटात अशोक सराफ (Ashok Saraf), लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde), सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आणि सिद्धार्थ रे (Siddharth Ray) हे कलाकार पाहायला मिळाले. लक्ष्मीकांत बेर्डे , सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांच्या कॉमेडीने तर प्रेक्षकांना खूप हसवले आहे.

सचिन पिळगांवकर यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सांगितले की, "अशी ही बनवा बनवी चित्रपटाचे डायलॉग मी लिहिलं आहेत. चित्रपटातून मोजून तीन डायलॉग सेटवर बोलले गेले. बाकी डायलॉग स्क्रीप्टमध्ये लिहिले होते. मी आणि वसंत सबनीस यांनी एकत्र मिळून चित्रपटाचे स्क्रिप्ट लिहिलं आहे."धनंजय माने इथेच राहतात का?" हा डायलॉग स्क्रीप्टमध्ये आधीपासून होता. हा डायलॉग शूटिंग करताना सुचला नाही आहे. हे ठरवून केलेलं आहे.

'अशी ही बनवा बनवी' चित्रपटातील फेमस डायलॉग

  • "धनंजय माने इथेच राहतात का?"

  • "हा माझा बायको पार्वती."

  • "सारखं सारखं एकाच झाडावर काय?"

  • "तुम्हाला काही लाज लज्जा आहे का?"

  • "अजून बारका नाही मिळाला?"

  • "जाऊबाई,नका हो जाऊ."

  • "70 रुपये वारले."

अशी ही बनवाबनवी

'अशी ही बनवाबनवी' चित्रपट 1988ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे त्रिकूट पाहायला मिळाले. चित्रपटात सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी स्त्री पात्र साकारली होती. या चित्रपटातील गाणी आजही धुमाकूळ घालतात. 'अशी ही बनवाबनवी' चित्रपट फुल कॉमेडी आणि मैत्रीवर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

SCROLL FOR NEXT