Sachin Pilgaonkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sachin Pilgaonkar : 'आम्ही सातपुते' हा चित्रपट सचिन पिळगांवकर यांनी का केला? स्वतः खुलासा करत म्हणाले...

Sachin Pilgaonkar On Aamhi Satpute Movie: मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी 'आम्ही सातपुते' चित्रपटाबद्दल किस्सा सांगितला आहे. या चित्रपटाची प्रेरणा कोण, याचा खुलासा केला आहे.

Shreya Maskar

सचिन पिळगांवकर यांनी 'आम्ही सातपुते' चित्रपटाबद्दल किस्सा सांगितला आहे.

'आम्ही सातपुते' सिनेमाची प्रेरणा इंग्रजी चित्रपटातून घेतली आहे.

'आम्ही सातपुते' चित्रपटात सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगावकर मुख्य भूमिकेत आहेत.

मराठी दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सचिन पिळगांवकर हे एक उत्तम दिग्दर्शक देखील आहेत. त्यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. नुकताच प्रवाह पिक्चर वाहिनीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी 'आम्ही सातपुते' या चित्रपटाच्या सेटवरचा एक किस्सा सांगितला आहे.

'आम्ही सातपुते' या चित्रपटाबद्दलही सचिन पिळगांवकर म्हणाले की, "मी 'आम्ही सातपुते' चित्रपट 'सत्ते पे सत्ता' हा हिंदी सिनेमा पाहून बनवला नाही. 'सत्ते पे सत्ता' चित्रपट 'सेव्हन ब्राईड्स फॉर सेव्हन ब्रदर्स' या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आला. आम्ही सुद्धा 'आम्ही सातपुते' चित्रपट बनवताना 'सेव्हन ब्राईड्स फॉर सेव्हन ब्रदर्स' चित्रपटातून प्रेरणा घेतली. 'सत्ते पे सत्ता' चित्रपटात दुहेरी भूमिका आहेत. मात्र आम्ही असे काहीच केले नाही. "

पुढे मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी सांगितले की, "'आम्ही सातपुते' (Aamhi Satpute) चित्रपटातील 'वहिनी' हे पात्र खूप आवडले. कारण ती घरी आल्यानंतर सगळ्यांना सुधारते." या चित्रपटाला प्रेक्षकांडून खूप प्रेम मिळाले. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली. आजही चित्रपटाची गाणी खूप प्रसिद्ध आहेत. चित्रपटात सुप्रिया पिळगावकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.

'आम्ही सातपुते' चित्रपट

2008 साली 'आम्ही सातपुते' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगावकर मुख्य भूमिकेत दिसले. यात सात भावांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगावकर स्वप्नील जोशी, अशोक सराफ, अतुल परचुरे, निर्मिती सावंत, अली असगर, वृषसेन दाभोळकर, आनंद अभ्यंकर, अमृता संत, स्वाती देवल आणि नयन जाधव यांनी काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banjara Reservation: बंजारा समाजासाठी OBC नेते मैदानात, सरकारला शह देण्यासाठी OBC नेत्यांची खेळी?

ATM Slip Fraud Alert: ATM ची स्लीप फेकणं महागात पडणार? स्लीप फेकल्याने KYC हॅक होणार?

Boat Capsized: धक्कादायक! प्रवाशांनी भरलेली बोट नदीत बुडाली, ८६ जणांचा मृत्यू

Chhagan Bhujbal: सरकारनं दबावाखाली जीआर काढला, छगन भुजबळ थेटच बोलले|VIDEO

Plane Emergency Landing : महिला पायलटच्या धाडसाने विमानाचा मोठा अपघात टळला; धैर्याने ७५ प्रवाशांचे प्राण वाचवले

SCROLL FOR NEXT