Abhishek Gaonkar And Sonali Gurav Engagement Instagram
मनोरंजन बातम्या

Abhishek And Sonali Engagement: शिवानी सोनार पाठोपाठ आणखी एका सेलिब्रिटी कपलने उरकला गुपचूप साखरपुडा, होणारी बायको आहे सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सर

Abhishek Gaonkar And Sonali Gurav: गुढीपाडव्याचा मूहूर्तावर 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेतील अभिषेक गावकरने साखरपुडा केला आहे.

Chetan Bodke

Abhishek Gaonkar And Sonali Gurav Engagement

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली आहे. यानंतर आता मराठीतील अजून एका कलाकाराने साखरपूडा उरकला आहे. गुढीपाडव्याचा मूहूर्तावर सारं काही तिच्यासाठी या मालिकेतील अभिषेक गावकरने साखरपुडा केला आहे.

झी मराठीवरील 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मालिकेतील श्रीनू हे पात्र अभिषेक गावकर साकारत आहे. अभिषेक नुकताच सोनाली गुरवसोबत साखरपुडा केला आहे. सोनाली ही सोशल मीडिया इन्फ्लुएनसर आहे. ती सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ पोस्ट करत असते.

गेल्या काही वर्षांपासून अभिषेक आणि सोनाली एकमेकांना डेट करत आहेत. त्यानंतर त्यांनी आता साखरपुडा केला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी अभिषेक आणि सोनाली गुरवने गणपती पुळेला जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते.त्यांचे गणपतीपुळ्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यांच्या साखरपुड्याच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अभिषेकने 'सारं काही तिच्यासाठी', 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'माझी माणसं', 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत काम केले आहे. तर सोनाली सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hema Malini : हेमा मालिनी यांनी अंधेरीतील २ आलिशान फ्लॅट्स विकले; किती कोटींमध्ये झाली डील, नफा वाचून थक्क व्हाल

Melghat : मेळघाटमधील तलावाचा बांध फुटला; रस्ते रहदारीसाठी बंद, गावांचा संपर्क तुटला, शेतीचेही मोठे नुकसान

Beed Crime: बीडमध्ये मध्यरात्री हत्येचा थरार, मित्राने मित्राला जागीच संपवलं; धारधार शस्त्राने वार नंतर...

Maharashtra Live News Update: सायन पनवेल महामार्ग वाहतूक कोंडी

Ankita Walawalkar: बिग बॉस फेम अंकिताचा लग्नानंतरचा पहिला ओवसा, कोकणाची पारंपारिक परा

SCROLL FOR NEXT