Mugdha Vaishampayan Bride To Be Party Instagram
मनोरंजन बातम्या

Mugdha Vaishampayan Bride To Be Party: लवकरच प्रथमेश- मुग्धाही चढणार लग्नाच्या बोहल्यावर, ‘ब्राइड टू बी’ पार्टीचे फोटो आले समोर

Chetan Bodke

Mugdha Vaishampayan Bride To Be Party

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ फेम प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) गेल्या काही दिवसांपासून आपल्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आले आहेत. प्रथमेश आणि मुग्धाने जुन २०२३ मध्ये, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची कबुली दिली होती. आता हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. सध्या सोशल मीडियावर मुग्धाच्या ‘ब्राईड टू बी’ या फंक्शनचे जोरदार फोटो व्हायरल होत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रथमेश आणि मुग्धा कायमच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. कायमच हे दोघेही चाहत्यांसोबत अनेक कार्यक्रमांमधील व्हिडीओ, एकमेकांमध्ये वेळ घालवतानाचे व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत असतात. नुकताच मुग्धाने सोशल मीडियावर इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून मैत्रींणींने केलेल्या ‘ब्राइड टू बी’ पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो रिपोस्ट केले असून सध्या सोशल मीडियावर या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे. याच पार्टीवरून प्रथमेश- मुग्धा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. अद्याप तिच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही.

Mugdha Vaishampayan Bride To Be Party
Mugdha Vaishampayan Bride To Be Party

नुकतंच मुग्धाची बहिण मृदुलचे लग्न पार पडले. अलिबागचे प्रसिद्ध व्यावसायिक विश्वजीत जोगळेकरसोबत मुग्धाच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. आता मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर मुग्धाही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. एकूणच प्रथमेश आणि मुग्धाच्या प्रेमाबद्दल बोलायचे तर, दोघांचीही ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ च्या मंचावर ओळख झाली होती. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये, एकत्र दिसले होते. त्यामुळे त्यांचे सतत भेटणं होऊ लागलं. नंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

Mugdha Vaishampayan Bride To Be Party
Mugdha Vaishampayan Bride To Be Party

दरम्यान, 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'च्या मंचावर ओळख होऊन एकमेकांना आयुष्याचा जोडीदार निवडणारी प्रथमेश आणि मुग्धा ही दुसरी जोडी आहे. यापूर्वी रोहित आणि जुईली यांची या शोच्या मंचावर भेट झाली. आधी मैत्री नंतर प्रेम असं करत दोघांनी लग्न केले. त्यानंतर प्रथमेश आणि मुग्धा यांची जोडी जमली. ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. (Entertainment News)

Mugdha Vaishampayan Bride To Be Party

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

SCROLL FOR NEXT