अल्ट्रा झकास मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म नवीन वर्षाची सुरुवात दमदार कंटेंट लाइनअपने करत आहे. आज ‘सौभाग्यवती सरपंच’ या बहुचर्चित वेब सिरीजचे पोस्टर लाँच करण्यात आले असून, ही वेब सिरीज 22 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संतोष कोल्हे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेली ही वेबसिरीज एका सशक्त महिलेची प्रेरणादायी कथा मांडते.
गावाच्या सरपंच पदासाठी लढा देणाऱ्या महिलेची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. या सिरीजमध्ये देविका दफ्तरदार, किशोर कदम, नागेश भोसले, आशा ज्ञाते, अश्विनी कुलकर्णी आणि अन्य प्रमुख कलाकार भूमिका साकारत आहेत.
याशिवाय, अल्ट्रा झकासवरील आणखी एक मोठा आकर्षण म्हणजे ‘रुखवत’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर जो 26 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. डिसेंबर 2024 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. सुशीलकुमार अग्रवाल प्रस्तुत या चित्रपटाची कथा एका कॉलेज ग्रुपच्या शैक्षणिक सहलीभोवती फिरते. प्राचीन वाड्यात सापडलेल्या ‘रुखवत’चा इतिहास उलगडताना प्रेक्षकांना रहस्यमय आणि थरारक अनुभव मिळेल. चित्रपटात अशोक समर्थ, अभिजीत चव्हाण, राजेंद्र शिसातकर यांच्या भूमिका आहेत.
तसेच, हॉलिवूडचा एक अॅक्शन आणि कॉमेडीचा संगम ‘Bending The Rules’ चित्रपट, 3 जानेवारी 2025 रोजी अल्ट्रा झकासवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट गरम डोक्याच्या वकिलाची आणि निलंबित पोलीस अधिकाऱ्याची गंमतीशीर कथा मांडतो, जिथे ते दोघे एका मोठ्या रहस्याचा पर्दाफाश करण्यासाठी एकत्र येतात.
‘सुपर ओव्हर’ हा तमिळ भाषेतील थ्रिलर चित्रपट, ज्यामध्ये क्रिकेट बेटिंगमुळे मित्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या थरारक घटनांची मांडणी आहे, तोही याच महिन्यात अल्ट्रा झकासवर उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर ‘बुलफाईट’ ही तमिळ वेब सिरीज, प्रेम, संघर्ष, आणि कुटुंबीयांमधील वादांनी भरलेली कथा, 10 जानेवारीपासून अल्ट्रा झकासवर पाहायला मिळेल.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सीईओ, श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “आम्ही प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम मनोरंजन आणण्याचा संकल्प केला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आम्ही विविध शैलीतील वेब सिरीज आणि चित्रपटांचा खजिना सादर करत असून, यामुळे प्रेक्षकांना दर्जेदार आणि मनोरंजक अनुभव मिळेल.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.