'माझं आता लग्न ठरलंय, रजा शिल्लक पाहिजे, तुम्ही पण...'; कोल्हापुरातील तरणाबांड पोलीस कर्मचाऱ्यानं पुण्यात आयुष्य संपवलं

Kolhapur Young Police Officer Suicide : स्वरूप जाधव हे मूळचे कसबा बावड्यातील भगवा चौक, मराठा कॉलनीचे रहिवासी होते. त्यांनी पुण्यातील स्वारगेट पोलीस लाईनमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या रूममधील खिडकीला टॉवेलच्या साहाय्याने त्यांनी गळफास घेतला.
Kolhapur Young Police Officer Suicide
Kolhapur Young Police Officer SuicideSaam Tv News
Published On

कोल्हापूर : कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कसबा बावडा येथील एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. स्वरूप विष्णू जाधव (वय २८) असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते पुणे पोलीस दलात कार्यरत होते. घरात लग्न सराईची तयारी सुरु असतानाच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

स्वरूप जाधव मूळचे कसबा बावड्यातील भगवा चौक, मराठा कॉलनीचे रहिवासी होते. त्यांनी पुण्यातील स्वारगेट पोलीस लाईनमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या रूममधील खिडकीला टॉवेलच्या साहाय्याने त्यांनी गळफास घेतला. जाधव हे २०२३ मध्ये पुणे पोलीस दलात भरती झाले होते. स्वरूप यांचं लग्न ठरलं होतं. दिवाळीनंतर ते लग्न करणार होते. 'माझं आता लग्न ठरलंय. रजा शिल्लक पाहिजे. दिवाळीनंतर मी लग्न करणार आहे. तुम्ही पण मुली बघा आणि लग्न करा', असं ते मित्रांना नेहमी सांगायचे, असं त्यांच्या वडिलांनी सांगितलंय.

Kolhapur Young Police Officer Suicide
Nagpur News : गणपती विसर्जनाच्या टाक्या, पोहण्याचा मोह आवरेना; खालीच फसल्यामुळे ७ वर्षीय लेकराचा बुडून मृत्यू

स्वरूप यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पुणे खडकवासला पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कुटुंबातील तरुण मुलाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. स्वरूप यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, आजी असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी बावडा स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. स्वरूप जाधव यांच्या अंत्यसंस्काराला मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती.

Kolhapur Young Police Officer Suicide
Nandurbar : झुलत्या पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, सरकार लक्ष देणार का? | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com